शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'या' ९ गोष्टींमुळे प्रत्येक कपलच्या गोड नात्यात पडतो मिठाचा खडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 2:17 PM

1 / 10
कुणावर प्रेम करणं ही फारच आनंद देणारी भावना असते. पण कधी कधी नात्यात असं काही होतं की, ज्यामुळे ही भावना त्रासदायकही ठरते. रोज रोज छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होणं आणि एकमेकांसोबत राहणंही चांगलं वाटत नाही. या स्थितींचा प्रत्येक कपल्सना सामना करावा लागतो. (Image Credit : www.lifehack.org)
2 / 10
१) एकमेकांपासून दूर राहणे - कधी कधी असं होतं की, ज्या व्यक्तीसोबत तुम्ही दिवसातील प्रत्येक क्षण राहता, त्या व्यक्तीसोबत एक मिनिट राहणाही चांगलं वाटत नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, आजारी असणे, पार्टनरचं वागणं न आवडणं, तणाव आणि वेळ नसणं. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही दोघे वेगळे होऊ लागता.
3 / 10
२) Boring वाटणं - जेव्हा तुम्ही अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला डेट करत असता तेव्हा काही गोष्टींचा कंटाळा यायला लागतो. याने नात्यात तुम्हाला वेगळेपणा काही वाटत नाही. त्यामुळे जर नात्याला पुन्हा नव्याने सुरू करायचं असेल तर दोघांनीही एकत्र येऊन त्यावर विचार करा. (Image Credit : dailyactive.info)
4 / 10
३) Jealousy वाटणे - काही लोकांमध्ये ईर्षेची भावना असते. याचं कारण नात्यात असुरक्षितता जाणवणे हे आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनरबाबत ईर्षेची भावना निर्माण होते. (Image Credit : www.sheknows.com)
5 / 10
४) एकमेकांचं न ऐकणं - कोणतही नातं टिकवून ठेवण्यासाठी एकमेकांना समजून घेणे आणि ऐकमेकांचं ऐकणे फार महत्त्वाचं आहे. असं झालं नाही तर नातं कमजोर होऊ लागतं. त्यामुळे लोक पार्टनरचं ऐकणं, समजून घेणं बंद करतात. (Image Credit : Crosswalk.com)
6 / 10
५) छोट्या गोष्टींवर भांडणं - घरात कामे दोघांनी मिळून केली तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. जेव्हा रिलेशनशिपमध्ये काही चांगलं होत नसतं, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी वाईट वाटू लागतात. यावरून भांडणं होतात. (Image Credit : www.mic.com)
7 / 10
६) संशय असणे - संशय घेणे कोणत्याही नात्यासाठी चांगलं नसतं. जेव्हा नात्यात काही खराब होतं तेव्हा संशय आपली जागा निर्माण करतो. (Image Credit : 1079thelink.radio.com)
8 / 10
७) बिझी राहणे - नातं मजबूत करण्यासाठी एकमेकांना वेळ देणं फार महत्त्वाचं असतं. जेव्हा नात्यात मिठाचे खडे पडायला लागतात, तेव्हा पार्टनरला वेळ देणं बंद केलं जातं आणि लोक बिझी राहू लागतात. (Image Credit : marriagemissions.com)
9 / 10
८) पैशांसाठी भांडण होणं - पैशांसाठी भांडणं सतत होत राहतात आणि एकमेकांचा हिशेब घेणं सुरू होतं. (Image Credit ; money.usnews.com)
10 / 10
९) परिवारावरून भांडणं - ज्या लोकांच्या नात्यात काही प्रश्न निर्माण होतात, तेव्हा त्यांच्या परिवारातील सदस्यांवरूनही भांडणं सुरू होतात. (Image Credit : www.cheatsheet.com)
टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप