शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चाणक्य नीती : सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाहापूर्वी परखून घ्या जोडीदारामधील हे पाच गुण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 3:44 PM

1 / 7
आनंदी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगला जोडीदार भेटणे आवश्यक असते. त्यामुळेच आपला जीवनसाथी आपल्यासाठी सुयोग्य असेल का? याची चिंता चिंता अनेकांना लागलेली असते. त्यामुळेच आपला विवाह अशा व्यक्तीशी व्हावा जी आपल्या भावना, मान-सन्मान आणि सुखांची काळजी घेईल, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.
2 / 7
आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्यनीतीमध्ये विवाह आणि जोडीदाराविषयी महत्त्वपूर्ण माहिती लिहून ठेवली आहे. विवाह करताना जोडीदार निवडताना कुठल्या गोष्टींची खबरदारी घेतली पाहिजे, याचे वर्णन केले आहे. जाणून घेऊया त्याविषयी...
3 / 7
चाणक्य सांगतात की, जीवनसाथी निवडताना त्याच्या काही गुणांची परख केली पाहिजे. व्यक्तीचे बाह्य सौंदर्य हे खरे सौंदर्य नसते. व्यक्तीचे मन आणि त्याचे विचार सुंदर असले पाहिजेत. त्यामुळे बाह्य सौंदर्य पाहून विवाह करणारी व्यक्ती संकटात सापडू शकते. तर अंतर्गत सौंदर्याची परख करून जोडीदाराची निवड करणारी व्यक्ती सुखी राहते.
4 / 7
विवाहापूर्वी जोडीदारावरील संस्कारांचीही माहिती घेतली पाहिजे. संस्कारच व्यक्तीला मान-सन्मान मिळवून देण्यात मदत करतात. संस्कारी जोडीदार घराला स्वर्ग बनवू शकतो. तसेच मुलांवरही चांगले संस्कार करून त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो.
5 / 7
धार्मिकदृष्टीने मर्यादित असलेली व्यक्ती साधारणपणे खूश राहते. आचार्य चाणक्यांच्या मते व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या धर्म-कर्मावरील विश्वास आणि मर्यादेची माहिती घेतली पाहिजे. मर्यादेत राहणारी व्यक्ती कधी चुकीचे काम करू शकत नाही.
6 / 7
धैर्यवान मनुष्य बिकट परिस्थितीचा सामना करण्याचे सामर्थ्य बाळगतो. त्यामुळे चाणक्य विवाह करण्यापूर्वी मनुष्याने आपल्या जोडीदारामधील धैर्यशीलतेची परख करावी, असा सल्ला देतात. विशेषतः स्रीमध्ये धैर्यशीलता असणे आवश्यक मानले गेले आहे. जर महिला धैर्यवान असेल तर ती कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यात सक्षम असते.
7 / 7
रागीट स्वभावाची व्यक्ती कधीच सुखी आणि यशस्वी होऊ शकत नाही. यश आणि सुखी संसार करण्यासाठी शांत स्वभाव असणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत जर दोघांपैकी एकाला प्रत्येक बाबतीत राग येत असेल तर त्याच्यासोबत सुखी जीवनाची कल्पना करता येऊ शकत नाही. त्यामुळे जोडीदार निवडताना तो रागीट स्वभावाचा नाही ना याची माहिती करून घ्या...
टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपFamilyपरिवारmarriageलग्न