Every couple struggle with these problems in their life
प्रत्येक कपलला लाइफमध्ये हमखास करावा लागतो 'या' 12 अडचणींचा सामना By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:49 PM1 / 14कोणतंही नातं परफेक्ट नसतं आणि हेदेखील तितकचं खरं आहे की, कोणालाही आपल्या पार्टनरसोबत वाद किंवा भांडण करायला आवडत नाही. परंतु नातं म्हटलं की, हेवेदावे, भांडणं, वादविवाद आलेच. का उद्भवतात या समस्या? कशामुळे होतात भांडणं? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील खालील काही समस्यांमधून..2 / 14आपल्या सर्वांचा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. जगातील कोणत्याच व्यक्तींचा स्वभाव आणि विचार करण्याची पद्धत एकसारखी नसते. असातच एखाद्या बाबतीत आपल्या पार्टनरच्या वेगळ्या विचारांबाबत किंवा सल्ल्याबाबत त्याला दोष देणं बरोबर नाही. अनेक कपल्स हिच चूक करतात आणि त्यामुळे वाद निर्माण होतात. 3 / 14गरजेचं नाही की, जेव्हा तुमची सेक्स करण्याची इच्छा असेल तेव्हा तुमच्या पार्टनरचीही तिच इच्छा असेल. त्यामुळे अशावेळी पार्टनरला समजून घेणं गरजेचं असतं. अशावेळी वाद घतल्याने नात्यामध्ये अनेक समस्या निर्माण होतात. 4 / 14पैसे खर्च करणं किंवा बचत करणं या गोष्टी प्रत्येकजण आपापल्या पद्धतींनी करत असतो. पैशांसंबंधित भांडणं कपल्समध्ये होणं य सर्व गोष्टी सामन्य आहेत. जरी तुम्ही दोघंही घरासाठी होणारा खर्च एकत्र मिळून करत असलात. तर हे वद होणं सामान्य आहे. अशावेळी दोघांनी समजून घेऊन वद मिटवणं गरजेचं असतं. 5 / 14तुम्ही किती वर्षांपासून एकमेकांसोबत आहात याचा काहीच फरक पडत नाही. नात्यामध्ये संशय आणि असुरक्षितता या दोन गोष्टी आल्या की, वाद होणारचं. ही कोणतीही समस्या नसून हा मानवाचा स्वभाव आहे. परंतु यातूनही तुम्ही एकत्र आहात म्हणजेच, तुम्ही एकमेकांना चांगले ओळखता. 6 / 14जवळपास सर्वच कपल्स एकदा तरी या समस्येचा सामना करतात. तुमचा पार्टनर आपला कलीग किंवा चांगला मित्र किंवा मैत्रीणीसोबत जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त पझेसिव्ह होता. अशातच संशय घेणं, वाद होणं यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी दोघांनी एकत्र येऊन एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं. 7 / 14सध्याच्या काळामध्ये आपली लाइफ फार बीझी आहे. खासकरून शहरांमध्ये राहणारे कपल्स कामाच्या व्यापामुळे एकमेकांन वेळ देऊ शकत नाहीत. अशातच अनेकदा तुमची आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी तुम्ही एकटेपणा जाणवू लागतो. अशावेळी समोरच्या व्यक्तीला समजून घेणं गरजेचं आहे. 8 / 14दोघांपैकी कोणीही फोन किंवा इंटरनेटवर बीझी राहत असेल तर वाद होणं सहजिक आहे. अशावेळी समजुतदार पणाने परिस्थिती हाताळून पार्टनरला फोनपासून दूर राहण्यास सांगणं फायदेशीर ठरतं. 9 / 14अनेकदा रिलेशनशीपमध्ये गैरसमजातून वाद होत राहतात. खरं तर ही समस्या नाही तर स्वभावच आहे. अशावेळी स्वतः समजूतदार होऊन परिस्थिती हाताळणं गरजेचं असून नात्यातील सर्व गैरसमज दूर करणं आवश्यक असतं. 10 / 14बऱ्याचदा अपूर्ण इच्छा किंवा अपेक्षा नात्यामध्ये वाद निर्माण करण्याचं कारण होतात. अशावेळी पार्टनरशी शांतपणे बोलून सर्व गोष्टी समजून घेणं आणि पार्टनरलाही समजावणं गरजेचं असतं. पार्टनरच्याही तुमच्याकडून काही इच्छा आणि अपेक्षा असतात. त्या समजून घेऊन जमेल तशा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 11 / 14नात्यामध्ये एकवेळ अशी येते की, त्यावेळी नात्याचा आणि पार्टनरचा कंटाळा येतो. सततचे वाद आणि भांडणं, एकमेकांना वेळ न देणं यांमुळे यांसारख्या समस्या उद्भवतात. अशावेळी शांतपणे ती परिस्थिती हाताळणं आणि पार्टनरशी बोलणं गरजेचं असतं. तुम्ही स्वतःसाठीही वेळ देऊ शकता. 12 / 14जर तुमच्यपैकी एखादी व्यक्ती स्वच्छताप्रेमी असेल आणि तुमच्या त्याच्य अगदी विरूद्ध असाल तर अशावेळी वाद होणं सहाजिक आहे. ओला टॉवेल बेडवरचं टाकणं, काहीही खाल्यानंतर प्लेट कुठेही ठेवून देणं यांसारख्या सवयीमुळे तुमचा पार्टनर आणि तुमच्यात भांडणं होऊ शकतात. 13 / 14पार्टनरचे आई-वडिल किंवा नातेवाईकांचा तुमच्यामध्ये हस्तक्षेप करणं वादाचं कारण ठरू शकतं. अशावेळी तुम्ही त्यांच्यासोबत वाद घालण्याऐवजी शांतपणे त्यांच्याशी बोलणं गरजेचं असतं. अन्यथा वाद आणखी वाढण्याची शक्यता असते. 14 / 14टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणत्याही बाबतीत कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. आणखी वाचा Subscribe to Notifications