foods for the baby's weight gain
मुलांचं वजन वाढवायचंय?,असा असावा पौष्टिक आहार By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 01:35 PM2018-10-26T13:35:18+5:302018-10-26T13:52:29+5:30Join usJoin usNext 1. मलई दूध : वजन वाढू नये यासाठी तुम्ही भलेही दुधावरील साय बाजूला काढत असाल. पण आपल्या मुलांचं वजन कमी असेल तर त्यांना सायसहीत दूध पाजा. मुलांना दूध आवडत नसेल तर त्यांना मिल्क शेक बनवून द्या. पण त्यामध्येही मलईचा अवश्य समावेश करा. 2. तूप आणि लोणी : तूप आणि लोणीचाही मुलांच्या आहारात समावेश करा. डाळींमध्ये तूप-लोणीचा वापर केल्यास मुलांच्या शारीरिरक वाढीवर याचा चांगला परिणाम दिसून येतो. 3. सूप, सँडविच, खीर आणि हलवा हे चारही पदार्थ लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं पौष्टिक असे आहेत. पण योग्य प्रमाणात त्यांचा आहारात समावेश करावा. 4. बटाटा : बटाट्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेस्ट असतात. वजन वाढवण्यासाठी बटाट्यांचाही आहारात समावेश करावा. 5. कडधान्य : नियमित स्वरुपात मोड आलेले कडधान्य मुलांना खाऊ घालावे. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. जर तुमचे बाळ खूपच लहान असेल तर त्याला डाळीचे पाणी पाजा. टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्सHealthHealth Tips