तुमची मुलं Sports Lover असतील तर अशी सजवा रूम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 11:51 AM2019-07-09T11:51:58+5:302019-07-09T12:03:59+5:30

लहान मुलांना खेळायला खूप जास्त आवडतं. घरातही खेळाचं वातावरण असावं असं त्यांना वाटत असतं. तुमची मुलं Sports Lover असतील तर त्यांची रूम कशी सजवायची हे जाणून घेऊया.

मुलांची रूम सजवण्याआधी त्यांच्या आवडी-निवडी लक्षात घ्या. कोणत्या खेळात रस आहे. त्यातील कोणकोणत्या गोष्टी त्यांना जास्त आवडतात हे जाणून घ्या. मुलांना आवडणाऱ्या खेळानुसार चांगल्या थीमची निवड करा.

गेम्स थीमवर जेव्हा रूम सजवतो त्यावेळी अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे मुलांना इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर करू नका.

रफ्फ वुडन ब्लॉगला हवं तसं पेंट करून त्याला हँगिंग पिन लावा. म्हणजे मुलं त्यांचं सामान त्याला लावू शकतात.

ग्लवस, कॅप, फूटबॉल, बॅट, नेट यासह वेगवेगळ्या थीमवर मुलांसाठी खास आणि आकर्षक बुक शेल्फ तयार करू शकता. तसेच त्यानुसार लँपची निवड करा.

बॉल डाईस शेपमध्ये असलेल्या खुर्च्यांची बसण्यासाठी निवड करा. बाजारात लहान मुलांना आवडतील अशा सुंदर आणि रंगीबेरंगी खुर्च्या उपलब्ध आहेत.

मुलांना माउटेनिंग, बास्केटबॉल, फुटबॉल यासारख्या खेळाची आवड असेल तर त्यानुसार रुमची भिंत तयार करून घ्या. खेळाडूचे फोटो ही पेंट करू शकता.

बेड कव्हर, उशी आणि खिडकीजवळ काही खेळणी ठेवा. रुममध्ये मुलांच्या आवडीच्या खेळाचे, खेडाळूचे फोटो लावा.