how to handle hyperactive child
तुमच्या मुलांना पटकन राग येतो का?, त्यांची अशा पद्धतीनं काढा समजूत By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:18 PM2018-09-10T14:18:06+5:302018-09-10T14:23:23+5:30Join usJoin usNext 1) लहान मुलांचे एकटेपण : सध्याच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या युगात कामावर जाणाऱ्या आई-वडिलांना आपल्या मुलांसाठी वेळ देणे शक्य होत नाही. यामुळे मुलं स्वतःला फार एकटे समजतात. यामुळे त्यांचा स्वभाव चिडचिडा आणि रागीट होतो. बहुतांश पालक मुलांच्या या स्वभावाकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही त्यांची मोठी चूक ठरते. मुलाचा स्वभाव रागीट का झालाय, याचे कारण पालकांनी शोधावे. त्याच्या तापट स्वभावाकडे दुर्लक्ष न केल्यास त्यांचे नुकसान होणार नाही. 2) मुलांवर हात उगारण्याऐवजी त्यांना प्रेमानं समजावा : रागीट, तापट असणाऱ्या मुलांना बऱ्याचदा पालकांची मारझोड सहन करावी लागते. बहुतांश वेळा पालक आपल्या मुलांना नातेवाईकांसमोर, मित्रमैत्रिणींसमोर ओरडतात, मारझोड करतात. याचा विपरित परिणाम मुलांच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर होतो. त्यामुळे मुलांवर हात उगारण्यापेक्षा त्यांना प्रेमाने समजावा. 3) स्वतःच्या चुका, समस्या, ताणतणावासाठी मुलांना दोषी धरू नका 4) मुलांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करा, घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करा, आठवड्यातून एकदा सिनेमा पाहण्याची योजना आखा. 5) मुलांच्या शाळेतील गंमती, मित्रमैत्रिणींसंदर्भात त्यांच्यासोबत गप्पा माराटॅग्स :रिलेशनशिपrelationship