how to plan low budget date with partner
गर्लफ्रेंडला खूश करायचंय?, कमी बजेटमध्ये अशी प्लॅन करा डेट By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 02:50 PM2018-12-22T14:50:18+5:302018-12-22T14:55:49+5:30Join usJoin usNext 1. लाँग ड्राईव्ह करा प्लान : कमी खर्चात पार्टनरला स्पेशल वाली फिलिंग द्यायची असेल तर तिला लाँग ड्राईव्हवर घेऊन जा. यामुळे तुम्हाला पार्टनरसोबत राहण्यास जास्तीत जास्त वेळदेखील मिळेल आणि रोमँटिक लाँग ड्राईव्हवर तुमचा जास्त खर्चही होणार नाही. 2. लंच डेट : जर तुम्हाला पार्टनरसाठी काही खास करण्याची इच्छा असेल तर तिला घरीच लंच डेटसाठी बोलवा. स्वादिष्ट आणि तिच्या आवडीचे जेवण बनवून दोघांनीही लंचचा आस्वाद घ्यावा. 3. सिनेमा पाहा : जर तुम्हाला कमी खर्चाची डेट प्लान करायची असेल तर थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणं, हा एक उत्तम पर्याय असतो. तुमच्या राहत्या ठिकाणापासून काही अंतरावर असणाऱ्या थिएटरमध्ये एखादा रोमँटिक सिनेमा पाहावा. 4. गेट टुगेदर : तुम्ही स्वतःच्या घरी किंवा मित्रांसोबत मिळून एक छोटासा गेट टुगेदर करू शकता. यामुळे तुमचा पार्टनरही खूश होईल आणि तुम्हाला एकमेकांना जाणून घेण्याची संधीही मिळेल. हवे असल्यास यादरम्यान तुम्ही विंडो शॉपिंगही करू शकता. 5. रोमँटिक ठिकाण निवडा : डेट रोमँटिक करण्यासाठी पार्टनरसोबत कोणत्याही पार्कमध्ये जा. बोटिंग आणि फिशिंग करायला मिळेल, अशा ठिकाणी जा. यासाठी जास्तीचा खर्चही होणार नाही आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला एकमेकांसोबत चांगला वेळही घालवता येईल. 6. कुठेही फिरा : डेटिंग केवळ दिखाव्यासाठी नसतात. पार्टनरसोबत मिळालेला वेळ तुम्हीही कोठेही आनंदात घालवू शकता. केवळ पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी योग्य जागेची निवड करा. 7. पार्टनरसोबत फास्टफूड खा : मुलींना तसंही फास्ट फूड खायला प्रचंड आवडते. त्यामुळे तुम्ही आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन पाणीपुरी, शेवपुरी किंवा चटपटीत असं काहीही पदार्थ खाण्याची योजना आखू शकता. अशा पद्धतीच्या डेटसाठी खूप कमी खर्च होईल.टॅग्स :रिलेशनशिपrelationshipRelationship Tips