if children have habit of stolen then know these tips
तुमची मुलं वस्तू चोरतात? अशी बदला वाईट सवय By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 02:59 PM2018-10-23T14:59:56+5:302018-10-23T15:23:32+5:30Join usJoin usNext लहान मुलं ही निरागस असतात. मात्र कधीकधी शाळेत दुसऱ्या मुलांची पेन्सिल, रबर, वही गुपचूप चोरतात आणि आपल्या बॅगेत टाकतात. तसेच एखाद्याची वस्तू आवडली की ती लगेच उचलतात. अनेकांना ही चोरी वाटते पण मुलं लहान असल्याने त्यांच्याकडून नकळत अशा चूका होतात. मुलांची ही चोरण्याची सवय मोठेपणी महागात पडू शकते. त्यामुळे तुमच्या मुलांना अशी सवय असेल तर ती बदलायची कशी हे जाणून घेऊया. मुलांनी केलेली चोरी हा पालकांसाठी एक गंभीर विषय आहे. मात्र तुम्ही तुमच्या मुलाकडे चोर म्हणून पाहू नका. मुलांना एखाद्याची वस्तू गुपचूप उचलायची सवय असेल तर त्यांना त्याची ही सवय अत्यंत चुकीची असल्याचं समजून सांगा. ओरडणं किंवा शिक्षा देण्यापेक्षा प्रेमाने त्यांना त्यांची चूक दाखवून द्या. मुलांनी एखादी वस्तू कधी आणि का चोरली हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मुलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्या. मुलं त्यांची चूक कबूल करत असताना त्यांच्यावर रागवू नका. रागवल्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो मुलाने चोरी का केली याचं खरं कारण तुम्हाला सांगितलं तर त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करा. मात्र कौतुक करताना त्यांना त्यांची चूक लक्षात आणून द्या. चोरी केल्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं. तसेच त्यांचे मित्र रागवू शकतात हे त्यांना पटवून द्या. मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवा. रोज त्यांची शाळेची बॅग चेक करा. जर त्यामध्ये एखादी दुसऱ्या मुलाची वस्तू आढळली तरी नक्की याबाबत मुलांकडे चौकशी करा. मुलांनी एखाद्याचं सामान चोरलं असेल तर त्यांना ते परत करून माफी मागायला सांगा. मुलांना प्रेमाने समजून देखील मुलं जर तीच चूक सातत्याने करत असतील तर थोडेसे कठोर व्हा. त्यांनी चूक केलीय याची त्यांना जाणीव करून द्या. जर पालकांनी मुलांच्या अशा चुकीकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगवे लागू शकतात. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम पालक होणं गरजेचं आहे.टॅग्स :रिलेशनशिपrelationship