एकतर्फी प्रेम करता? मग हे चित्रपट नक्की पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 02:55 PM2018-09-26T14:55:30+5:302018-09-27T07:37:15+5:30

अयान- ऐ दिल है मुश्किल या चित्रपटात रणबीर कपूरनं अयानची भूमिका केली होती. तर अनुष्का शर्मानं अलिजेहची भूमिका साकारली होती. अलिजेहवर मनापासून प्रेम करणारा, तिच्यात प्रेयसी शोधणारा अयान रणबीरनं उत्तम साकारला. मात्र अलिजेह अयानला फक्त मित्र मानायची. त्यामुळे दोघांमध्ये अनेकदा वाद व्हायचे. मात्र चित्रपटाच्या शेवटी दोघेही मित्र म्हणून एकत्र येतात. मुलगा आणि मुलगी मित्र म्हणून राहू शकतात. प्रेमात दुसऱ्याच्या मताचा, निर्णयाचा आदर करायचा असतो, हे यातून पाहायला मिळतं.

एलिजाबेथ- लगान लगान चित्रपटात इंग्रज घराण्यातील एलिझाबेथचं भुवनवर (आमीर खान) एकतर्फी प्रेम असतं. भुवन आणि त्याच्या गावातील इतरांना क्रिकेट शिकवता शिकवता त्याच्या प्रेमात पडते. मात्र याची कल्पना नसते. त्याचं गावातील गौरी नावाच्या मुलीवर प्रेम असतं. ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता, त्या व्यक्तीनं तुमच्यावर प्रेम केलंच पाहिजे, अशी काही सक्ती नसते, हे हा चित्रपट शिकवून जातो.

सिड- दिल चाहता है या चित्रपटातील मैत्री अनेकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात तीन मित्रांची गोष्ट दाखवली आहे. त्यातील सिड (अक्षय खन्ना) घटस्फोट घेतलेल्या तारा नवाच्या महिलेच्या प्रेमात पडतो. मात्र तारा कायमच सिडला मित्र मानते. शेवटी सिडच्या हाती काहीच लागत नाही. वय हा फक्त आकडा असतो, असं म्हणतात. मात्र अनेकदा हा आकडा महत्त्वाचा ठरतो, कधीकधी तर यामुळे नाती संपुष्टातदेखील येतात, हे या चित्रपटात पाहायला मिळालं.

कुंदन- रांझना बनारसमध्ये चित्रित झालेल्या रांझना चित्रपटातील डायलॉग लोकांना आजही आठवतात. यामध्ये कुंदनची भूमिका धनुशनं साकारली होती. कुंदन आणि जोया (सोनम कपूर) लहानपणी प्रेमात पडतात. मात्र दोघे दूर जातात आणि नातं संपुष्टात जातं. यानंतर जोयाच्या आयुष्यात अभय देओल येतो. कुंदन आणि जिया नंतर पुन्हा भेटतात. मात्र जियाच्या मनात आधीसारखं प्रेम नसतं. मात्र तरीही कुंदन प्रेमासाठी खूप काही करतो. आयुष्यात एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही, तर ती विसरुन पुढे जायला हवं, हा धडा या चित्रपटातून घेता येईल.

राहुल- डर राहुलचं प्रेम एकतर्फी असतं आणि ज्यावेळी ते सर्व सीमा ओलांडतं, तेव्हा त्यातून डर चित्रपटाची कथा उलगडते. राहुलचं प्रेम हद्द ओलांडतं, तो किरणच्या (जुही चावला) अक्षरश: प्रेमात वेडा होतो. मात्र किरण दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल, तर तिच्यावर त्यासाठी जबरदस्ती करु नका. दुसऱ्या व्यक्तीलादेखील मन असतं. तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार असतो. त्याचा आदर करा, अशी शिकवण डर चित्रपट देतो.