Raksha Bandhan 2019 Special : Rakhi gift idea for brother
Raksha Bandhan 2019 : लाडक्या भावाला देण्यासाठी हटके आणि कूल गिफ्ट्स! By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:45 PM2019-08-13T16:45:26+5:302019-08-13T16:49:39+5:30Join usJoin usNext रक्षाबंधन म्हणजे, भावा-बहिणींमधील प्रेमाचा सण. हा दिवस आणखी खास करण्यासाठी फक्त भावानेच नाहीतर बहिणीही भावांसाठी गिफ्ट शोधत असतात. तुम्हीही रक्षाबंधनाची दिवस आठवणीत राहण्यासाठी भावासाठी खास गिफ्टच्या शोधात असाल तर आज आम्ही तुम्हाला काही क्लासी ऑप्शन्स सांगणार आहोत. वॉलेट तुमच्या भावाला एखादं स्टायलिश वॉलेट गिफ्ट करा. मार्केटमध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील. तुम्ही ऑनलाइनही खरेदी करू शकता. पण ऑनलाइन खरेदी करताना थोडी काळजी घ्या. व्यवस्थित शहानिशा करून त्यानंतरच खरेदी करा. ब्लूटूथ हेडफोन आपल्या भावाला एखाद्या चांगल्या ब्रॅडचे ब्लूटूथ हेडफोन्स खरेदी करू शकता. बाजारात अनेक स्टायलिश आणि क्लासी ब्रॅड्स उपलब्ध आहेत. तुमच्या भावाच्या आवडीनुसार चांगले हेडफोन्स खरेदी करा. पर्सनलाइज्ड फोन कव्हर पर्सनलाइज्ड फोन कव्हर हा गिफ्ट देण्यासाठी उत्तम पर्याय आहे. तुम्ही तुमच्या भावाला दोघांचा एक छानसा फोटो घेऊन तो कव्हरवर प्रिंट करून देऊ शकता. किंवा त्याच्या आवडीनुसार एखादा कव्हर खरेदी करू शकता. हॉलिडे ट्रिप धावपळीच्या युगामध्ये आपल्या लोकांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायला वेळच मिळत नाही. मग विचार कसला करताय? भावासोबत एक मस्त ट्रिप प्लॅन करा. शेड्स सीझन कोणताही असला तरिही शेड्स यूज करू शकता. शेड्समुळे लूक आणखी क्लासी दिसण्यासाठी मदत होते. त्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की, त्याच्याकडे आधीपासूनच कोणते शेड्स आहेत. त्यानंतर त्यांच्यासाठी शेड्स खरदी करा. घड्याळ तुमचा भाऊ जर कधीच कुठे वेळेवर पोहोचत नसेल तर त्याला वेळेच महत्त्व पटवून देण्यासाठी वॉच गिफ्ट करू शकता. टॅग्स :रक्षाबंधनरिलेशनशिपRaksha BandhanRelationship Tips