Raksha Bandhan 2019 : रक्षाबंधन स्पेशल करायला 'हे' गिफ्ट्स करतील मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 12:41 PM2019-08-14T12:41:26+5:302019-08-14T12:46:36+5:30

'रक्षाबंधन' हा बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा सण. बहिण भावाच्या नात्यातील गोडवा कायम राहण्यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. हटके गिफ्ट्स देऊन हे रक्षाबंधन स्पेशल करता येईल.

लहानपणापासून भावंडांचे खूप फोटो असतात. अशाच काही खास फोटोंचं कोलाज करून ते तुम्ही भावंडांना गिफ्ट करू शकता. यामुळे बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल.

अनेकदा आनंदाचे क्षण हे व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यासोबत ठेवले जातात. अशाच काही मजेशीर, हटके व्हिडीओंची एक सीडी तयार करून गिफ्ट करा.

बहीण आणि भावाचं नातं खास असतं. मात्र अनेकदा भांडणांमुळे अबोला धरला जातो. तुम्हाला त्यांच्याबाबत काय वाटतं, तुमचं किती प्रेम आहे हे पत्राच्या माध्यमातून व्यक्त करा. एक छानसं पत्र लिहा यामुळे नातं आणखी घट्ट करा.

भाऊ-बहिणीमध्ये अनेकदा भांडणं होत असतात. त्याच दरम्यान एकमेकांना चिडवलं जातं. असेच हटके कोट्स असलेले कुशन किंवा तुमचे खास फोटो गिफ्ट करा.

पुस्तक वाचण्याची आवड असेल तर एखादं छानसं, प्रेरणादायी पुस्तक भेट द्या. एखाद्या सरप्राईज पार्टीचं आयोजन करून भावंडांना आनंदी करा.

हेडफोन, पाकिट, पॉवर बँक, गॉगल, वॉच, पर्सनलाईज्ड फोन कव्हर यासारख्या लागणाऱ्या गोष्टी देखील गिफ्ट करू शकता.