Relationship tips Marathi : How to know your husband is cheating on you
पार्टनरच्या आयुष्यात नक्कीच 'तो' किंवा 'ती' आहे; जर वागण्यात झाला असेल 'असा' बदल By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 5:25 PM1 / 9रिलेशनशिपमध्ये असताना एकमेकांवर प्रेम करत असलेल्या कपल्समध्ये कधी दुरावा निर्माण होईल. याबाबत काहीही सांगता येत नाही. अनेकदा नात्यात तोचतोचपणा येणं, अपेक्षा पूर्ण न होणं. त्यामुळे दोघांमध्ये तिसरी व्यक्ती येण्याची शक्यता असते. खरंच एखाद्या नात्यात असं झालं असेल तर वेळेवर निर्णय घेणं गरजेचं आहे.2 / 9वेळीच लक्ष दिल्यास तुम्ही आपलं लग्न टिकवू शकता. आज आम्ही तुम्हाला पार्टनरची अशी लक्षणं सांगणार आहोत. ज्यावरून तुम्ही आपल्या पार्टनरच्या आयुष्यात तुमच्याव्यतिरिक्त कोणी आहे की नाही याबाबत माहिती मिळवू शकता. आज आम्ही तुम्हाला धोका देत असलेल्या पार्टनरच्या लक्षणांबाबत सांगणार आहोत. 3 / 9मोबाईक किंवा लॅपटॉपबाबत सतत अलर्ट असणं: लग्न झालेले कपल्स आपल्या मोबाईलबाबत रिलॅक्स असतात. पत्नीपासून किंवा पतीपासून काय लपवणार असा समज असतो. पण जर तुमचा पार्टनर मोबाईबाबत जास्त अर्लट असेल, फोनला वेगवेगळे पासवर्ड ठेवण्यापासून, तुम्हाला फोनला हात न लावू देणं, किंवा तुम्हाला वेळ न देता सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवणं. याचा अर्थ तुमचा पार्टनर तुमच्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करत आहे.4 / 9शारीरिक संबंध: शारीरिक संबंध हा वैवाहीक आयुष्याचा भाग आहे. जर पार्टनर तुमचा स्पर्श नेहमी टाळत असेल किंवा तुमच्याप्रती कोणत्याही भावना पार्टनरच्या मनात नसतील तर वागण्यातील हा बदल मोठ्या धोक्याचा संकेत देणारा असू शकतो. 5 / 9ऑफिसमध्ये काम वाढल्याचं कारणं : अचानक तुमचा पार्टनर जास्त बीझी असेल आणि कामाचा ताण असल्याचे कारण देत असेल तर इतरांना वेळ देण्यासाठी तुम्हाला असं खोट कारण सांगत असण्याची शक्यता आहे. कधीतरी खरंच कामाचा ताण असल्यामुळे घरी यायला उशीर होत असेल. पण सतत ही बाब होत असेल तर विचार करण्याासारखी गोष्ट आहे. 6 / 9 भावनीक दुरावा : जर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात तुमच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर विचारांची किंवा भावनिक देवाण घेवाण जास्त होणार नाही. कारण तुमच्यापेक्षा बाहेरची व्यक्ती पार्टनरला महत्वाची वाटत असते. तुम्हाला कोणत्या गोष्टींचं वाईट वाटतं. त्याबाबत त्यांना फारशी काळजी नसते. 7 / 9लुक्सकडे जास्त लक्ष देणं : चांगला आणि स्टायलिश लूक सगळ्यांनाच आवडतो. पण रिलेशनशिपच्या सुरूवातीला मुलं आणि मुली याबाबत जास्त जागरुक असतात. नंतर लुक्सकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात कोणी असेल तर आपला चेहरा, ड्रेसिंग, परफ्यूम, स्वतःला मेंटेन ठेवणं यांकडे जास्त लक्ष देताना तुम्हाला दिसून येईल.8 / 9लुक्सकडे जास्त लक्ष देणं : चांगला आणि स्टायलिश लूक सगळ्यांनाच आवडतो. पण रिलेशनशिपच्या सुरूवातीला मुलं आणि मुली याबाबत जास्त जागरुक असतात. नंतर लुक्सकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात कोणी असेल तर आपला चेहरा, ड्रेसिंग, परफ्यूम, स्वतःला मेंटेन ठेवणं यांकडे जास्त लक्ष देताना तुम्हाला दिसून येईल.9 / 9लुक्सकडे जास्त लक्ष देणं : चांगला आणि स्टायलिश लूक सगळ्यांनाच आवडतो. पण रिलेशनशिपच्या सुरूवातीला मुलं आणि मुली याबाबत जास्त जागरुक असतात. नंतर लुक्सकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. जर तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात कोणी असेल तर आपला चेहरा, ड्रेसिंग, परफ्यूम, स्वतःला मेंटेन ठेवणं यांकडे जास्त लक्ष देताना तुम्हाला दिसून येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications