teach good habits to your children
मुलांना या 7 गोष्टी शिकवा, मग बघा ते कधीच आजारी पडणार नाहीत By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 3:12 PM1 / 81. मुलांना सूर्योदयापूर्वी उठवावे : आपल्या लहान मुलांना आरोग्यदायी फायद्यासाठी त्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. सूर्योदयानंतर अंथरुणात त्यांना लोळत ठेऊ नका, मुलं आळशी होतात. सूर्योदयापूर्वी त्यांना उठवल्यास संपूर्ण दिवस ताजेतवाने वाटते. शिवाय, मुलांमध्ये आळस निर्माण होण्याऐवजी ते सक्रिय होतात. 2 / 82.दातांची योग्य स्वच्छता : अंथरुणातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी दातांची योग्यपद्धतीनं स्वच्छता करण्याची सवय मुलांना लावावी. दात वर-खाली तसंच आतील-बाहेरील बाजूंनी स्वच्छ करण्यास त्यांना सांगावे. महत्त्वाचे दुसऱ्यांचा ब्रश वापरणं आरोग्यासाठी चांगले नसते, हे देखील त्यांना सांगावे. 3 / 83. नखे साफ करणे : घाणेरड्या आणि मोठ्या नखांमुळे अनेक आजार होण्याची शक्यता असते. नखांमधील जंतू खाद्यपदार्थाद्वारे पोटात जातात,यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. शिवाय, मोठ्या नखांमुळे स्वतःला तसंच दुसऱ्यांनाही दुखापत होण्याची भीती असते. त्यामुळे लहान मुलांची नखे वाढल्यानंतर लगेचच कापावीत.4 / 84.अन्न हे पूर्णब्रह्म : काही मुलं खाताना प्रचंड नखरे करतात. काहींना सकाळी दूध प्यायला आवडत नाही, चहाच पिण्याच हट्ट करतात. पण लहान वयात चहा पिण्याची सवय आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय वाईट असते. जेवणाच्या ताटात जे काही वाढलेले असेल ते सर्व खाण्याची सवय मुलांना लावाली. खाण्यापूर्वी रडण्याचीही वाईट सवय अनेकांना असते, यामुळे खाल्लेले-प्यायले शरीराला लागत नाही. 5 / 85. नियमित आंघोळ करावी : काही मुलांना तर आंघोळच करायलाच कंटाळा येतो. शाळेत जाण्यापूर्वी काही जण फक्त केस ओले करतात आणि आंघोळ केल्याचं भासवतात. ही सर्वात वाईट सवय आहे. नियमित आंघोळ करण्याचे फायदे आपल्या मुलांना पटवून द्या. आंघोळ केल्यानं आपण दिवसभरासाठी ताजेतवाने राहतो, आळस येत नाही. शाळेत जे काही शिकवलं आहे तेदेखील लक्षात राहण्यात मदत होते. 6 / 86. पुस्तक-वह्यांना थुंकी लावू नये : बहुतांश मुलांना बोटांना थुंकी लावून पुस्तकं किंवा वह्यांची पानं उलटण्याची सवय असते. पुस्तकांवरील अक्षरं केमिकलच्या मदतीनं छापली जातात. यामुळे हे केमिकल पोटात जाऊन आजारांची लागण होण्याची शक्यता असते. 7 / 87.नियमानं हात धुवा : अस्वच्छ हातांमुळे कित्येक भयानक आजारांची लागण होते. यामुळे अभ्यासानंतर तसंच जेवणानंतर हात स्वच्छ धुवावेत. 8 / 88. पेन्सिलनं कान कोरू नये : लहान मुलांना पेन्सिलने कान कोरण्याची सवय असते. यामुळे गंभीर इजा होण्याची भीती असते. कानाचा पडदा फाटण्याचीही शक्यता असते. काडेपेटी, पिन, पेन किंवा पेन्सिलनं कान कोरू नये. याचे तोटे आपल्या मुलांना समजावून सांगावेत. आणखी वाचा Subscribe to Notifications