these 5 ways to control to more active children
तुमची मुलं जास्तच अॅक्टिव्ह आहेत? मग हे पाच उपाय वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 04:43 PM2018-09-07T16:43:01+5:302018-09-07T16:48:18+5:30Join usJoin usNext 1. मुलांना वेळ द्या : जर मुलं जास्तच अॅक्टिव्ह असतील तर त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्यांच्याजवळ बसून त्याची समजूत काढावी. त्याच्या शेजारी बसून त्यांच्यासोबत प्रेमाचे दोन शब्द बोलावेत. प्रेमाने स्पर्श करावा. त्यांना आपला वेळ द्या. 2. विविध कला शिकवाव्यात : जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या मुलांचा मेंदू व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना विविध कला शिकवाव्यात. घरामध्ये चिकनमाती, रंग पेटी, रंगबेरंगी पेन्सिल इत्यादी साहित्य ठेवावे. जेणेकरुन मुले चित्रकला, रंगरंगोटीमध्ये मग्न राहतील. 3. वेळापत्रक तयार करावे : मुलांसाठी वेळापत्रक तयार करावे. यामुळे ते संपूर्ण दिवस व्यस्त राहतील. इतरत्र त्यांचे लक्ष भटकणार नाही. वेळेत खाण्या-पिण्याची सवय, झोपण्या-उठवण्याची सवय आणि खेळण्याचीही सवय त्यांना लावावी. 4. शीतपेये पिण्याची सवय लावू नये : मुलांना गोड पदार्थ कमी खाण्यास द्यावे, कारण गोड पदार्थ खाल्ल्यानं त्यांच्या शरीरातील ऊर्जा वाढते. शीतपेय, कृत्रिमरित्या बनवण्यात आलेले पदार्थ, गोड पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत. 5. प्राणधारणा, प्राणायाम शिकवावे : मन आणि डोके शांत राहावे, यासाठी मुलांना प्राणधारणा, प्राणायामचे प्रकार शिकवावेत. श्वासांवर लक्ष केंद्रीत करण्याचे तंत्र त्यांना शिकवावे. यामुळे एकाग्रता वाढण्यासही मदत होते.टॅग्स :रिलेशनशिपहेल्थ टिप्सrelationshipHealth Tips