these 5 ways to control to more active children
तुमची मुलं जास्तच अॅक्टिव्ह आहेत? मग हे पाच उपाय वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 4:43 PM1 / 51. मुलांना वेळ द्या : जर मुलं जास्तच अॅक्टिव्ह असतील तर त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्यांच्याजवळ बसून त्याची समजूत काढावी. त्याच्या शेजारी बसून त्यांच्यासोबत प्रेमाचे दोन शब्द बोलावेत. प्रेमाने स्पर्श करावा. त्यांना आपला वेळ द्या. 2 / 52. विविध कला शिकवाव्यात : जास्त अॅक्टिव्ह असणाऱ्या मुलांचा मेंदू व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना विविध कला शिकवाव्यात. घरामध्ये चिकनमाती, रंग पेटी, रंगबेरंगी पेन्सिल इत्यादी साहित्य ठेवावे. जेणेकरुन मुले चित्रकला, रंगरंगोटीमध्ये मग्न राहतील.3 / 53. वेळापत्रक तयार करावे : मुलांसाठी वेळापत्रक तयार करावे. यामुळे ते संपूर्ण दिवस व्यस्त राहतील. इतरत्र त्यांचे लक्ष भटकणार नाही. वेळेत खाण्या-पिण्याची सवय, झोपण्या-उठवण्याची सवय आणि खेळण्याचीही सवय त्यांना लावावी.4 / 54. शीतपेये पिण्याची सवय लावू नये : मुलांना गोड पदार्थ कमी खाण्यास द्यावे, कारण गोड पदार्थ खाल्ल्यानं त्यांच्या शरीरातील ऊर्जा वाढते. शीतपेय, कृत्रिमरित्या बनवण्यात आलेले पदार्थ, गोड पदार्थ आहारातून वर्ज्य करावेत.5 / 55. प्राणधारणा, प्राणायाम शिकवावे : मन आणि डोके शांत राहावे, यासाठी मुलांना प्राणधारणा, प्राणायामचे प्रकार शिकवावेत. श्वासांवर लक्ष केंद्रीत करण्याचे तंत्र त्यांना शिकवावे. यामुळे एकाग्रता वाढण्यासही मदत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications