these things of husband will irritate wife
तुमच्या या सवयींमुळे पत्नी म्हणते, 'आता माझी सटकली, मला राग येतोय' By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 3:39 PM1 / 51. तुमच्या आईसोबत तुलना करणे : 'तु छान दिसत आहेस पण माझ्या आईएवढी सुंदर दिसत नाहीस', पत्नीला सतावण्यासाठी याहून अधिक काहीही बोलण्याची गरज नाही. पण वारंवार या वाक्याचा उच्चार झाला तर यामुळे मोठे भांडण होण्याची शक्यता आहे. 2 / 52. दुसऱ्या महिलांसोबत तुलना : पतीनं दुसऱ्यानं स्त्रीचं केलेलं कौतुक कोणतीही पत्नी खपवून घेत नाही. कारण तिला ते आवडतच नाही. त्यामुळे जर तुम्ही आपल्या पत्नीसमोर दुसऱ्या स्त्रीची तारीफ करुन तुलना करणार असाल तर ही गोष्ट जरा काळजीपूर्वकच करा. कारण तुमच्या घरात वादंग निर्माण होऊ शकतात. 3 / 53. रिमोटवरील वर्चस्व : ऑफिसवरुन घरी आल्यावर बऱ्याचदा पुरुष मंडळी टीव्हीसमोर बैठक मांडून बसतात. बहुतांश पुरुष मंडळी पत्नी आवडती मालिका पाहत असतानाच जराही विचार न करता चॅनेल बदलतात. तुमच्या या सवयीचा पत्नी वर्गाला खूप राग असतो. 4 / 54. वस्तू जागच्या जागी न ठेवणे : बहुतांश पुरुषांना आपल्या वस्तू जागच्या जागी न ठेवता अस्ताव्यस्त इथे-तिथे ठेवण्याची सवय असते. ओला टॉवेल पलंगावर ठेवणे, घाणेरडे मोजे सोफ्याच्या खाली फेकणे या आणि अशा कित्येक तुमच्या त्रासदायक सवयींमुळे पत्नी हैराण होते. कारण घराचा पसारा आवरण्यात तुमच्या पत्नीचा अख्खा दिवस खर्च होतो, घरातील कामं करुन ती थकते. त्यामुळे तुमच्या सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्यास तिला मदत होईल. 5 / 55. स्वतःची चूक मान्य न करणे : चूक असतानाही पती आपल्या चुका बऱ्याचदा मान्य करत नाहीत. यामुळे पती-पत्नीमधील वाद मोठ्या प्रमाणात वाढतात. आणखी वाचा Subscribe to Notifications