Tips to control little ones temper in public places
घराबाहेर असताना लहान मुलांची चिडचिड अशी करा कंट्रोल! By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 11:17 AM1 / 6कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात. अशावेळी अनेक पालक हे आपल्या मुलांवर चिडतात. पण अशाप्रकारे चिडून मुलं शांत होत नाहीत. उलट ते आणखी जास्त आरडाओरड करतात. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये रागावलेल्या मुलांना शांत कसं करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 2 / 6मिठी मारा - अशावेळी त्याला मिठी मारल्याने, प्रेमाने जवळ घेतल्याने, त्याला आवडणारं गाणं गुणगुणल्याने तुम्हाला मदत मिळू शकते. हे केल्याने लहान मुलांचा राग शांत होऊ शकतो. घाई करु नका कारण लहान मुलांचा राग लगेच शांत होत नाही.3 / 6खेळणं द्या - कुठेही जाताना सोबत काही खेळणी ठेवा. जेव्हा तुमचं मुल जोरात रडायला लागेल किंवा राग करायला लागेल, तर त्याला खेळणं द्या. याने त्याचं रागावरील लक्ष भरकटेल. हा उपाय पब्लिक प्लेसमध्ये फायदेशीर ठरु शकतो. 4 / 6खायला द्या - जास्तीत जास्त लहान मुलं ही भूकेमुळे चिडचिडपणा करतात. त्यामुळे आपल्यासोबत नेहमी काही स्नॅक्स ठेवा. जेणेकरुन लहान मुलांना भूक लागली तर त्यांना देऊ शकाल. लहान मुलांचा राग शांत करण्यासाठी हा चांगला उपाय आहे. (Image Credit : www.popsugar.com)5 / 6शांततेने बोला - कधी कधी लहान मुलांचा राग दूर करण्यासाठी या कोणत्याच टिप्स कामात येत नाहीत. अशावेळी त्यांच्याशी शांततेने बोला आणि त्या स्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे लहान मुलं चिडचिड करत असतील तर त्यांच्याशी बोला, त्याला काही देण्याऐवजी त्याला बाहेर फिरायला घेऊन जा. 6 / 6झोपेमुळेही चिडचिड - लहान मुलं भूकेसोबतच झोपेमुळेही चिडचिड अधिक करतात. त्यामुळे तुम्ही कुठे बाहेर असाल तर त्याला झोपवण्याचा प्रयत्न करा. तो लगेच शांत होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications