tips parents should keep in mind while leaving kids alone at home
मुलांना घरी एकटं सोडता? मग 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 2:55 PM1 / 7आई-वडील कामानिमित्त बाहेर असल्याने अनेकदा घरी लहान मुलं एकटी असतात. त्यामुळे घरी त्यांची काळजी घ्यायला कोणीच नसतं. मुलांना एकटं सोडून बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 2 / 7काही लहान मुलं घरी एकटं राहायला घाबरतात. त्यांना थोडा वेळ एकटं राहू दे म्हणजे त्यांची एकटेपणाची भीती कमी होईल. 3 / 7लहान मुलांना घरातील सर्व गोष्टींना हात लावायची सवय असते. मात्र बाहेर जाताना विजेच्या बोर्डला टेप लावा. म्हणजे लहान मुलांना त्याचा त्रास होणार नाही. 4 / 7चाकू, सुई, ब्लेड यासारख्या घरात असलेल्या धारदार वस्तू मुलांपासून लांब ठेवा. 5 / 7काही महत्त्वाच्या कामानिमित्त मुलांना एकटं सोडून अचानक बाहेर जावं लागत असेल तर स्वयंपाक घरातील सिलेंडरा नॉब खालून बंद करा. 6 / 7घरात एखादा पाळीव प्राणी असेल तर मुलांकडे विशेष लक्ष द्या. कारण अनेकदा प्राणी हिंसकही होतात. 7 / 7लहान मुलांशी मोकळेपणाने संवाद साधा. त्यांना घरातील सदस्यांच्या फोन नंबरची माहिती द्या. तसेच इमर्जन्सी नंबर ही सांगा. आणखी वाचा Subscribe to Notifications