3 remedies for constipation, how to get rid of constipation
जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा-कॉन्स्टिपेशन होणार नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2024 9:05 AM1 / 7बऱ्याच जणांना शौचास साफ होण्यास खूप त्रास होतो. पोट लवकर साफ होत नाही. रोजच सकाळी उठून जोर द्यावा लागतो. तरीही पोट स्वच्छ होत नाही. (3 best remedies for constipation)2 / 7तुम्हालाही असाच कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर सकाळी उठल्यानंतर काही वेळासाठी शरीराच्या काही विशिष्ट हालचाली करा. यामुळे आतड्यांचे स्नायू, पोटाचे स्नायू मोकळे होऊन पोट साफ होण्यास मदत होईल. (how to get rid of constipation?)3 / 7ते व्यायाम नेमके कोणते याविषयीची माहिती सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली.4 / 7त्यांनी सांगितलेला पहिला व्यायाम आहे मलासन. काही सेकंदासाठी मलासन करा आणि त्यामध्ये १ ते ३ मिनिटे चाला.5 / 7त्यानंतर दुसरा व्यायाम आहे उदराकर्षणासन. हा व्यायाम करण्यासाठी मलासनात बसा. त्यानंतर उजव्या पायाचा गुडघा वाकवून डाव्या तळपायाजवळ ठेवा. नंतर डावा गुडघा वाकवून उजव्या तळपायाजवळ ठेवा. १ ते ३ मिनिटांसाठी अशा पद्धतीने शारीरिक हालचाल करा. 6 / 7तिसरी हालचाल म्हणजे पवनमुक्तासन ते भद्रासन अशी हालचाल करणे. सुरुवातीला पवनमुक्तासन करा आणि त्यानंतर उठून लगेच भद्रासन करा. पुन्हा भद्रासनातून पवनमुक्तासन करा. असं साधारण १० ते १२ वेळा करा. 7 / 7हे ३ व्यायाम किंवा शारिरीक हालचाली केल्यानंतर पोट साफ होण्यास नक्कीच मदत होईल, असं अंशुका परवानी सांगतात. आणखी वाचा Subscribe to Notifications