शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Shopping Tips For Lehenga: लग्नासाठी महागडा लेहेंगा खरेदी करताना लक्षात ठेवा ८ गोष्टी, नाहीतर चुकीची खरेदी करून पस्तावाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 3:31 PM

1 / 10
१. सध्या लग्नसराई असल्याने खरेदीला उधाण आले आहे.. स्वत:च्या किंवा मित्रमैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या लग्नासाठी छानसा लेहेंगा घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी या काही गोष्टी तपासून घ्यायलाच पाहिजेत..
2 / 10
२. चांगला लेहेंगा घ्यायचा म्हणजे त्याची सुरुवातच कमीतकमी २ ते अडीच हजारांपासून होते. आता एवढे पैसे आपण खर्च करणार म्हटल्यावर त्या अनुशंगाने येणाऱ्या इतर काही गोष्टींचा विचार व्हायलाच हवा.
3 / 10
३. लेहेंगा कोणत्या रंगाचा घ्यायचा, हे आधीपासूनच डाेक्यात पक्क ठरवून जाऊ नका. कारण आपण जो रंग ठरवला आहे, त्यापेक्षा इतर अनेक आकर्षक रंग आपल्याला दिसू शकतात. प्रत्येक लेहेंगा अंगावर टाकून बघा आणि त्यानंतरच कोणता घ्यायचा ते ठरवा.
4 / 10
४. तुम्ही जे बजेट ठरवलं आहे, त्याच्यावर ठाम रहा.. थोडंफार बजेट वाढवायचं ठरलं तर किती वाढवावं, याचं नियाेजन आधीपासून करून ठेवा. म्हणजे मग ऐनवेळी गडबड नको. कारण लेहेंगा खरेदीसोबतच इतरही अनेक ॲक्सेसरीज घ्याव्या लागतात, त्यावरही बराच पैसा खर्च होतो.
5 / 10
५. लेहेंगा घेताना आपण जास्त फोकस लेहेंगा आणि ब्लाऊज यावरच ठेवतो. पण त्याची ओढणी कशी आहे, त्यावरचं काम, रंग कसा आहे हे देखील निरखून बघा. कारण लेहेंग्याचा गेटअप छान खुलवणं हे बऱ्याच प्रमाणात ओढणीवरही अवलंबून असतं.
6 / 10
६. मनात जरा जरी कन्फ्युजन झालं असेल तरी खरेदी करू नका. कारण जोपर्यंत त्या कपड्याबाबत आपण कॉन्फिडन्ट नसतो, तोपर्यंत तो कपडा आपल्यावर खुलून दिसत नाही.. ''हे मला छान दिसतं..'', असं जेव्हा आपल्या मनातून येतं, तेव्हा आपण अधिक छान दिसतो..
7 / 10
७. लेहेंग्यासोबत आपण कोणते अंडर गारमेंट्स घेणार, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण ती जर योग्य पद्धतीची नसतील, तर ऐनवेळी सगळाच गोंधळ उडू शकतो.
8 / 10
८. लेहेंग्यासोबत परफेक्ट मॅच होणाऱ्या दागदागिन्यांची आणि चपलांचीही अचूक खरेदी करता आली पाहिजे. कारण त्यामुळेच तुमचा लूक उठून दिसतो.
9 / 10
९. लेहेंगा परफेक्ट फिटिंगचाच हवा. त्यामुळे तो आधी घालून पहा आणि आपल्या मापाला अगदी परफेक्ट आहे या याचा अंदाज घ्या..
10 / 10
१०. लेहेंगा खरेदी करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्या ऋतुमध्ये तो घालणार आहात, त्यावेळी ऊन असणार की थंडी? त्या हवामानानुसार तुमच्या लेहेंग्याची निवड योग्य ठरणार का? हे देखील तपासून घेणं गरजेचं आहे. नाहीतर ती निवड अजिबातच आरामदायी ठरणार नाही.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशनmarriageलग्न