शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेंदूच्या विकासासाठी सर्वोत्तम आहे 'हा' पदार्थ, मुलांना आवर्जून खाऊ घाला, मुलं होतील बुद्धिमान- हुशार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 4:51 PM

1 / 8
मेंदूच्या विकासासाठी सर्वोत्तम असणारा पदार्थ कोणता याविषयी एका संशोधकांनी नुकताच एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. उमा नायडू असं त्यांचं नाव असून त्या मागच्या २० वर्षांपासून 'brain foods' याविषयी संशोधन करत आहेत.
2 / 8
moneycontrol.com यांनी दिलेल्या वृत्तानुसार उमा नायडू या हॉर्वर्ड विद्यापीठात मानसोपचार तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञ म्हणून काम करत आहेत. त्यांनी मेंदूविषयी जो काही अभ्यास केला, त्यातून मेंदूच्या आरोग्यासाठी उत्तम आहार कोणता, याविषयी त्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत.
3 / 8
त्यानुसार मेंदूसाठी सर्वोत्तम असणारा घटक म्हणजे ओमेगा ३ फॅटी ॲसिड हा आहे. हा घटक ज्या पदार्थांमधून मिळेल ते पदार्थ खाल्ल्याने मेंदू तल्लख राहण्यास मदत होते. त्यामुळे मेंदू ॲक्टीव्ह ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांनी ओमेगा ३ फॅटी ॲसिड देणारे पदार्थ खाल्ले पाहिजेत.
4 / 8
ओमेगा ३ फॅटी ॲसिडचे सप्लिमेंट घेण्यापेक्षा ते आहारातून घेण्याचा प्रयत्न करावा, असं नायडू यांचं म्हणणं आहे. त्यानुसार शाकाहारी लोकांनी काही पदार्थ आवर्जून त्यांच्या राेजच्या आहारात घ्यायलाच पाहिजेत.
5 / 8
त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे चिया सीड्स. साधारण २८ ग्रॅम एवढे चिया सीड्स तुम्ही रोज वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून घेतले तर तुमची दिवसभराची ओमेगा ३ फॅटी ॲसिडची गरज पूर्ण होते.
6 / 8
यानंतर दुसरा पदार्थ आहे तीळ. त्यामुळे फक्त संक्रांत काळातच तीळ खाण्यापेक्षा नेहमीच थोडे थोडे तीळ खायला हवेत.
7 / 8
तिसरा पदार्थ आहे अक्रोड. रोज रात्री झोपण्यापुर्वी २ ते ४ अक्रोड पाण्यात भिजत घाला आणि दुसऱ्या दिवशी ते रिकाम्या पोटी खा.
8 / 8
चौथा पदार्थ आहे जवस. जवस भाजून ठेवले की ते मुखवासासारखे खाता येते. किंवा जवसाची चटणीही तुम्ही खाऊ शकता. यातून मेंदूला चांगले पोषण मिळते.
टॅग्स :foodअन्नkidsलहान मुलंHealth Tipsहेल्थ टिप्स