Calcium rich fruits for healthy teeth and strong bones
मुलांना दूध आवडत नसल्यास 'ही' फळं द्या, भरपूर कॅल्शियम मिळून दात- हाडं होतील बळकट By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 12:13 PM1 / 9कॅल्शियम मिळावं म्हणून वाढत्या वयातल्या मुलांनी दूध प्यावं असं त्यांच्या आईला वाटतं. पण बऱ्याच मुलांना दूध अजिबात आवडत नाही. दूध पाहताच ते नाक मुरडतात.2 / 9अशा मुलांना भरपूर प्रमाणात कॅल्शियम देणारी छान चवदार फळं खाऊ घाला. बऱ्याच मुलांना फळं खायला आवडतं. त्यामुळे त्यांच्या आवडीची ही फळं त्यांना दिली तरी त्यांना योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळेल, जेणेकरून त्यांची हाडं आणि दात मजबूत राहतील.3 / 9ही फळं फक्त लहान मुलांनीच नाही, तर मोठ्या व्यक्तींनीही खायला पाहिजेत. हावर्ड विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार पन्नाशीच्या वरच्या महिलांना दिवसभरातून १२०० मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते तर पन्नाशीच्या आतल्या महिलांना १००० मिलीग्रॅम कॅल्शियमची गरज असते. ही गरज या काही फळांमधून नक्कीच पुर्ण होऊ शकते.4 / 9त्यापैकी सगळ्यात पहिलं आहे जर्दाळू. याचं सेवन नियमितपणे करा. आपल्याकडे लहान मुलांनाही जर्दाळू उगाळून दिलं जातं. 5 / 9दुसरं आहे किवी. हे फळ फक्त व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे असं आपल्याला वाटतं. पण त्यातून कॅल्शियमही भरपूर प्रमाणात मिळतं. एका मध्यम आकाराच्या किवीतून साधारण ६० मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम मिळतं. 6 / 9संत्री किंवा मोसंबी या फळांमधूनही चांगल्या प्रमाणात कॅल्शियम मिळतं. अशी फळं सहसा सगळ्यांनाचा आवडतात. त्यामुळे मुलांनाही ती नक्की खाऊ घाला. 7 / 9बेरी प्रकारातली फळं ही जसं व्हिटॅमिन सी ने समृद्ध असतात, तसंच्या त्यांच्यातून योग्य प्रमाणात कॅल्शियमही मिळतं. त्यामुळे ही फळंही नियमितपणे खायला पाहिजेत. 8 / 9 अननसातून कॅल्शियम, व्हिटॅमिन्स आणि इतर खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे हे फळ आवर्जून खायला पाहिजे. 9 / 9पपई हा देखील कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत मानला जातो. तुम्ही सधारण १०० ग्रॅम पपई खाल्ली तर त्यातून २० मिलीग्रॅम कॅल्शियम मिळतं. आणखी वाचा Subscribe to Notifications