शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हिवाळा स्पेशल: पाहा भारतातल्या ७ सुप्रसिध्द शाली, उबदार-पारंपरिक वस्त्र-आधुनिक काळातही तितकंच स्टायलिश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2024 5:51 PM

1 / 8
हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण शाल वापरतो. शाल अंगावर पांघरली की हुडहुडणाऱ्या थंडीपासून आपला बचाव होतो. साडी, ड्रेस, जीन्स अशा कोणत्याही आऊटफिटवर शाल ( The 7 Best Types of Winter Shawls for Women to Wear in Winter) अगदी सहज शोभून दिसते. अशा या शालींचे देखील अनेक प्रकार आहेत. आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या आऊटफिटवर वेगवेगळ्या प्रकारच्या शाली पांघरुन घेऊ शकतो. शालींचे आगळेवेगळे प्रकार आणि त्यांची नाव नेमकी काय आहेत ते पाहूयात.
2 / 8
नागा शाल ही नागालँडची खासियत म्हणून ओळखली जाते. या शालीमध्ये प्रामुख्याने काळा, लाल, मरुन, पांढरा आणि पिवळा इतकेच रंग फार मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. या शालींवर शक्यतो अमूर्त आकार किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भौमितिक रचनांचे डिझाईन्स असते. नागा शाल लोकरीचा वापर करुन तयार केल्या जातात.
3 / 8
भुजोडी शाल ही गुजरातची खासियत आहे, जी पूर्वापार ५०० वर्षांपासून बनवली जाते. ही शाल सुंदर वेगवेगळ्या गडद रंगात असते आणि त्यावरची रचना सहसा भौमितिक असते.
4 / 8
कांथा शाल ही पश्चिम बंगालची विशेष ओळख आहे. पश्चिम बंगालमध्ये केल्या जाणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या नक्षीकामाला 'कांथा' असे म्हटले जाते. असे नक्षीकाम इथल्या शालींवर फार मोठ्या प्रमाणात केले जाते म्हणून या शालींना 'कांथा शाल' असे म्हटले जाते. यात वेगवेगळ्या प्रकरचे पॅचवर्क देखील केले जाते. शालींवर नक्षीकाम करण्यासाठी शक्यतो चमकदार आणि गडद रंगांचा वापर केला जातो.
5 / 8
आंध्रप्रदेशची खासियत असणारी कलमकारी शाल आपल्या सगळ्यांच्या कपाटात असते. या प्रकारच्या शालींवर हँड प्रिंट आणि ब्लॉक प्रिंट डिझाइन्स केल्या जातात. यासोबतच यात गडद आणि फिक्या किंवा पेस्टल शेड्स जास्त प्रमाणांत असतात. कलमकारी शाल साडी, ड्रेस, जीन्स यांसारख्या आऊटफिट्सवर अधिक शोभून दिसतात.
6 / 8
पश्मीना शालींचा प्रकार शालींमध्ये सर्वात जास्त फेमस आहे. पश्मीना शाल काश्मीरमध्ये बनवली जाते आणि जगभरात तिच्या रॉयल लुकसाठी ओळखली जाते. शालीच्या या प्रकारात पश्मिना फॅब्रिकवर क्लिष्ट भरतकाम केले जाते, ज्याला आरी, कानी आणि सोजनी असे म्हणतात.
7 / 8
कुल्लू - मनालीमध्ये पट्टू शालींचा प्रकार फारच फेमस आहे. या शालीच्या प्रकाराला 'लोई' असे देखील म्हणतात. ही शाल केवळ नैसर्गिक लोकरीचा वापर करुन तयार केली जाते. ज्यामध्ये भौमितिक आणि फुलांचे डिझाईन्स फार मोठ्या प्रमाणावर असतात.
8 / 8
ही शाल औरंगाबाद आणि हैदराबादची खासियत आहे. जी आता बाजारात क्वचितच पाहायला मिळते. या शाल रेशीम आणि सुती धाग्यापासून बनवल्या जातात. या शालींवर पर्शियन आकृतीचे डिझाईन्स असतात. ही शाल राजेशाही किंवा एकदम रॉयल लूक देते.
टॅग्स :fashionफॅशनStyling Tipsस्टायलिंग टिप्स