शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कपाळावरचे केस जास्तच पांढरे दिसून येतात? रोज ५ पदार्थ खा, डाय न लावता काळेभोर होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 10:49 AM

1 / 7
वाढत्या वयात केस पांढरं होणं खूपच कॉमन आहे. एकदा केस पांढरे व्हायला सुरूवात झाली की काहीही केलं तरी केसांचा काळा रंग परत येत नाही. डाय करून तात्पुरेत केस काळेभोर दिसतात नंतर पुन्हा ग्रे व्हायला सुरूवात होते.(Top Five Foods for Hair)
2 / 7
केस पांढरे होणं टाळण्यासाठी तुम्ही आधीपासून आहारात बदल केले तर पुढे ताण येणार नाही. केसांचा नैसर्गिक काळा रंग टिकून राहण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करायचा ते पाहूया. तज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टापोस्टच्या माध्यमातून याबबात अधिक माहिती दिली आहे.
3 / 7
आवळ्या मोठ्या प्रमाणात एंटी ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन सी असते. ज्यामुळे केस पांढरे होणं टाळता येतं. आवळा पावडर किंवा ज्यूसच्या स्वरूपात तुम्ही आहारात घेऊ शकता.
4 / 7
काळ्या तिळात मेलेनिन असते. ज्यामुळे नॅचरल काळा रंग टिकून राहण्यास मदत होते. चपातीमध्ये तुम्ही २ ते ३ चमचे तीळ घालू शकता किंवा कच्चे तीळ खाल्ले तरी अनेक फायदे मिळतात
5 / 7
मनुक आयर्नचा उत्तम स्त्रोत आहेत. यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. यातील मिनरल्स त्वचा आणि केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरततात.
6 / 7
कढीपत्त्यात व्हिटामीन, ए, बी, सी आणि बी-१२ असते. याव्यतिररिक्त यात आयर्न आणि कॅल्शियम असते. यामुळे केस गळती कमी होऊन केस पांढरे होण्याची समस्याही टळते. आहारातही तुम्ही कढीपत्त्याचा समावेश करू शकता.
7 / 7
रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी गाईचे तूप उत्तम मानले जाते. केस पांढरे काळे करण्याासाठी A2 गाईचे तूप उत्तम मानले जाते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सHair Care Tipsकेसांची काळजी