Health Benefits of Eating Guava Fruit in Winters : Guava fruit eating benefits
हिवाळ्यात रोज १ पेरू खा; ८ गुणकारी फायदे- वजन कंट्रोलमध्ये येईल, पोट नेहमी साफ राहील By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 8:37 AM1 / 9हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात ताजे पेरू दिसायला सुरूवात होते. पेरू खाल्ल्याने फक्त जीभेला चव येत नाही तर आरोग्याला भरपूर फायदे मिळतात. थंडीच्या दिवसात पेरू का खावा ते पाहूया. पेरू खाण्याची योग्य वेळ नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधली आहे. सकाळच्या नाश्त्याच्या २ तासानंतर आणि दुपारच्या जेवणानंतर १ ते २ तासांनी तुम्ही पेरू खाऊ शकता. संध्याकाळी पेरू खाणं टाळायला हवं.2 / 9पेरू खाल्ल्याने बॅक्टेरिअल संक्रमणापासून बचाव होतो. बदलत्या वातावरण बॅक्टेरियाजमुळे तब्येत खराब होण्याचा धोका असतो. पेरूच्या सेवनाने बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका टाळता येतो.3 / 9जर कमी वयात तुमच्या त्वचेवर पिंपल्स किंवा सुरकुत्या येऊ लागल्या असतील तर तुम्ही पेरूचा आपल्या आहारात समावेश करू शकता. डेली डाएट आणि स्किन केअर रूटीनमध्ये याचा समावेश करून त्वचेवर ग्लो मिळवता येईल.4 / 9पेरूमध्ये फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. याचा पाचक रस पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत होतो. यामुळे एसिडिटी, अपचनाचा त्रास जाणवत नाही.5 / 9रोज पेरू खाऊन तुम्ही त्वचेवरचा ग्लो वाढवू शकता. कारण पेरूमध्ये एंटी ऑक्सिडेंट्स असतात. यासह व्हिटामीन सी आणि व्हिटामीन के असते. 6 / 9पेरू खाल्ल्ल्याने फुफ्फुसांमध्ये जास्त कफ तयार होत नाही. श्वासांच्या समस्याही उद्भवत नाहीत. याच्या सेवनाने इन्फ्लूएंजा व्हायरसच्या संक्रमणापासून लढण्यास मदत होते. 7 / 9डायबिटीक रुग्णांसाठी पेरू एक उत्तम फळ आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे गुण रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रणात ठेवतात.8 / 9पोटातील गॅसची समस्या टाळण्यासाठी पेरू हे उत्तम फळ आहे. कारण यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट साफ राहते आणि पचनाचे विकार उद्भवत नाहीत.9 / 9पेरू खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. हे फळं व्हिटामीन ए, सी समृद्ध आहे. याशिवाय यात जिंक, कॉपर यांसारखी तत्व असतात. म्हणून आहारात पेरूचा समावेश करायला हवा. आणखी वाचा Subscribe to Notifications