Home Cleaning Hacks : How to clean plastic and steel buckets in just 2 minutes
अंघोळीच्या बादल्या कळकट-जुन्या दिसतात? २ ट्रिक्स वापरा; नव्या कोऱ्या-स्वच्छ दिसतील बादल्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 1:19 PM1 / 7आपण बाथरूमच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो पण बाथरूमधील मग, बादल्यांच्या स्वच्छतेकडे अजिबात लक्ष देत नाही. अशात जर घरी पाहूणे आले तर अस्वच्छ बादल्या अजिबात चांगल्या दिसत नाहीत. बाथरूमच्या टाईल्स स्वच्छ केल्या जातात पण बादल्यांवरचे डाग तसेच राहतात. बादल्यांवर पिवळेपणा जमा झाल्यास त्या जुनाट दिसू लागतात. 2 / 7बेकिंग सोड्याचा (Baking Soda) वापर करून तुम्ही स्वयंपाकघरातील अनेक गोष्टी स्वच्छ करू शकता. बेकिंग सोडा एक उत्तम क्लिनिंग एजेंटचे काम करतो. २ मिनिटांत बादल्या स्वच्छ करण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम पर्याय आहे. याच्या वापराने फक्त २ मिनिटांत बादली स्वच्छ होईल.3 / 7सगळ्यात आधी बादलीतून घाणं पाणी किंवा कपडे बाहेर काढा. त्यानंतर एका वाटीत बेंकीग सोडा, डिशवॉश सोप आणि लिंबाचा रस मिसळा. एक टुथब्रथ घ्या आणि पेस्ट लावून बादली व्यवस्थित स्वच्छ करा. शेवटी बादली स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायाने बादली नव्यासारखी चमकेल.4 / 7व्हिनेगरच्या (White Vinegar) वापरानं तुम्ही जेवणाची चव वाढवू शकता. याशिवाय घाणेरड्या, मळलेल्या बादल्याही स्वच्छ करू शकता. सगळ्यात आधी एका वाटीत १ कप व्हाईट व्हिनेगर घ्या त्यात थोडं पाणी घाला. या मिश्रणात स्पंज भिजवून बादली घासा. या उपायानं डाग सहज निघून जातील. 5 / 7वापरात नसलेल्या टुथब्रशवर टुथपेस्ट लावून त्याने बादली घासा. १० ते १५ मिनिटांसाठी बादली तशीच ठेवा नंतर स्वच्छ धुवा. या उपायाने बादलीवरील पिवळा थर दूर होण्यास मदत होईल.6 / 7बादलीवरील घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही लिंबाचा वापरही करू शकाता. लिंबू आणि बेकींग सोडा बादल्यांवर लावा आणि बादल्या १० ते १५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. मग स्वच्छ पाणी ओतून बादल्या स्वच्छ करा.7 / 7बादल्या खराब होऊ नयेत यासाठी बाथरूममधील सर्व कामं झाल्यानंतर रोजच्या रोज बादल्याही साबण आणि घासणीने स्वच्छ धुवा. सुकल्यानंतर एका कोरड्या कापडानं बादल्या पुसून घ्या. आणखी वाचा Subscribe to Notifications