home remedies for cleaning house, how to clean house using kitchen products, house cleaning tips
घर स्वच्छ- चकाचक ठेवण्याचे स्वस्तात मस्त उपाय, बघा घरगुती पदार्थ वापरून कशी करायची स्वच्छता By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2024 05:33 PM2024-04-20T17:33:22+5:302024-04-20T17:40:06+5:30Join usJoin usNext घराची स्वच्छता करून घर छान मेन्टेन ठेवणं हे मोठंच कौशल्याचं काम असतं आणि त्याची जबाबदारी प्रामुख्याने घरातल्या बाईवरच असते. घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते. घरातलेच काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येते. ते कसं करायचं ते पाहूया लिंबाचा वापर करून तुम्ही घरातले स्टीलचे नळ स्वच्छ करू शकता. बोअरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करता येतात. सिंकमधून, बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते. ती कमी करण्यासाठी सिंकमधे बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका. आणि नंतर त्यावर कडक पाणी ओता. दुर्गंधी जाईल. स्वयंपाक घरातल्या ट्रॉलीला असणारे स्तीलचे हॅण्डल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा. आरसे, खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमान पत्राचा कागद आणि टूथपेस्ट वापरून पाहा लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑईल टाका. फर्निचरवर छान चमक येईल. फरशा पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला. फरशा स्वच्छ दिसतील, चमकतील. टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीCleaning tipsHome remedy