How to choose lipstick shade according to the dress colour, 5 tips for the perfect lipstick shade
ड्रेसच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड कशी निवडायची? बघा ६ टिप्स- दिसाल आणखी सुंदर- आकर्षक By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 3:25 PM1 / 9लिपस्टिक लावल्याने तुमचं व्यक्तिमत्त्व खुलण्यास आणखी मदत होते, हे अगदी खरं आहे. पण त्यासाठी तुम्ही लावत असलेली लिपस्टिक तुम्हाला सूट झाली पाहिजे. 2 / 9बऱ्याचदा आपण तयार होताना लिपस्टिकचा कोणता शेड लावावा, याबाबतीत कन्फ्यूज असतो. असं लिपस्टिकचा शेड निवडण्याबाबत कोणतंही कन्फ्यूजन मनात असेल तर या ५ टिप्स तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. (5 tips for the perfect lipstick shade )3 / 9यामध्ये आपण कोणत्या रंगाच्या ड्रेसवर कोणत्या रंगाची लिपस्टिक लावली तर अधिक खुलून दिसते, ते पाहूया.. (How to choose lipstick shade according to the dress colour)4 / 9तुमचा ड्रेस जर लाल किंवा केशरी रंगाचा असेल तर त्यावर गुलाबी किंवा मरून रंगाची लिपस्टिक छान दिसेल. 5 / 9पांढरा, मोतिया रंगाचा ड्रेस घातल्यावर न्यूड शेड किंवा गुलाबी शेडमधली लिपस्टिक लावावी.6 / 9निळ्या रंगाच्या ड्रेसवर पीच किंवा लाईट पिंक लिपस्टिक छान दिसते.7 / 9हिरवा रंगाचा ड्रेस घातल्यावर नेहमीच न्यूड किंवा हलका बरगंडी शेड असणारी लिपस्टिक लावा. आणखी सुंदर दिसाल.8 / 9पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तर ऑरेंज किंवा ब्रीक रेड शेडची लिपस्टिक अधिक आकर्षक वाटेल.9 / 9काळ्या रंगाचा ड्रेस असेल तर लाल, मरून किंवा कॉफी कलरची लिपस्टिक लावा. आणखी वाचा Subscribe to Notifications