शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाथरूमच्या टाईल्स खराब झाल्या? ३ टिप्स, ५ मिनिटांत बाथरूममधले डाग, चिकटपणा होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 6:51 PM

1 / 7
बाथरूमची साफसफाई करणं स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनंही महत्वाचं असतं. लोक डिप क्लिनिंग न करता वर वर साफ-सफाई करतात पण बाथरूमध्ये घाण तशीच राहते. (Bathroom Cleaning tips) बाथरूम स्वच्छ करण्याचे काही सोपे हॅक्स तुमचं काम सोपं करू शकतात. यामुळे बाथरूम नव्यासारखं दिसू लागेल आणि कानाकोपऱ्यात अजिबात कचरा दिसणार नाही. (Cleaning Hacks)
2 / 7
टॉयलेट-बाथरूम स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारचे ब्रशेस उपलब्ध आहेत. जर तुम्हाला बाथरूमचा प्रत्येक कोपरा उजळावायचा असेल, तर जुना टूथब्रश घ्या आणि ब्रशने टॉयलेटचे बारीक कोपरे स्वच्छ करा. (How to Deep Clean Your Bathroom in Easy Steps)
3 / 7
स्पंज अतिशय लवचिक असतो. याचा वापर करून तुम्ही बाथरूम चकचकीत, स्वच्छ करू शकता. स्पंजच्या एका भागात छिद्र करा, त्यामध्ये जुना टूथब्रश चिकटवा.
4 / 7
ज्या ठिकाणी ब्रश पोहोचू शकत नाही तो भाग स्वच्छ करण्यासाठी बाथरूम क्लीनरचा वपर करा. बेसिनमागील स्क्रू, टॉयलेट शीटचे झाकण आणि इतर अनेक ठिकाणी जिथे हात पोहोचू शकत नाहीत तिथे फ्लेक्सिबल ब्रश वापरा.
5 / 7
एका भांड्यात व्हिनेगर, सोडा, लिंबू, लिक्विड डिश वॉश आणि पाणी मिसळून सोल्यूशन तयार करा आणि ते सर्वत्र शिंपडून स्वच्छ करा.
6 / 7
पिवळ्या टाइल्स, टाइल्समध्ये अडकलेली घाण, सिंक आणि जाळी साफ करण्यासाठी हे द्रावण वापरा.
7 / 7
सगळ्यात आधी या द्रावणाचा फवारा टाईल्सवर मारा. त्यानंतर ब्रशने फरशी घासा मग त्यावर पाणी ओला. जास्त हट्टी डाग असतील तर अर्धा तास आधी हार्पिक घालून ठेवा. या उपायानं कमी वेळात टाईल्स स्वच्छ होतील.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सHealthआरोग्य