How to reduce light bill at home? 7 simple tricks to save your money
वीज बिल होईल झर्रकन कमी, इलेक्ट्रिक वस्तू वापरताना लक्षात ठेवा ७ सोप्या टिप्स, करा बचत By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2022 02:15 PM2022-06-04T14:15:55+5:302022-06-04T15:17:39+5:30Join usJoin usNext १. दर महिन्याला घरी येणाऱ्या विजेच्या बिलावरचे आकडे पाहून डोळे पार पांढरे व्हायची वेळ येते.. एवढं बील आलंच कसं असा प्रश्नही पडतो.. कारण एवढे पैसे बिलात घातल्यामुळे मग महिन्याचं सगळंच आर्थिक बजेट कोलमडतं. सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये दिसणारं हे दर महिन्यातलं चित्र. २. आपल्या घरात असलेल्या इलेक्ट्रिक वस्तू वापरताना आपल्याकडून कळत- नकळत काही चुका होतात आणि त्याचाच फटका आपल्याला बसलेला असतो. या चुका टाळल्या तर नक्कीच दर महिन्याच्या वीज बिलात कपात होईल आणि पैशांची बचत करता येईल. ३. कोणत्याही इलेक्ट्रिक वस्तूवर जेवढे अधिक स्टार असतात तेवढीच त्याची वीजेची बचत करण्याची क्षमता अधिक असते. त्यामुळे वस्तू विकत घेताना स्टार किती ते पहा आणि त्यानंतरच खरेदी करा. ४. घरात जास्तीतजास्त LED बल्बचा वापर करावा. ट्यूबलाईटऐवजी एलईडीचा वापर केल्यास नक्कीच पैशांची बचत होईल. ५. घरात खूप जुने पंखे असतील तर ते बदलून टाका. BLDC पंखे वापरा तसेच पंखे घेताना त्यावरचे BEE रेटिंग तपासून पहा. ६. एसीचे बील जास्त येऊ नये, म्हणून तापमान २३ ते २५ डिग्री सेल्सियस या दरम्यान ठेवा. तसेच वेळोवेळी सर्व्हिसिंग करून एसीची फिल्टर जाळी स्वच्छ करा. ८ ते १० वर्षे जुना असलेला एसी वापरू नका. तसेच एसी असणारी खोली पुर्णपणे पॅक असेल, हवा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या. ७. फ्रिज आणि त्याच्या आजूबाजूच्या भिंती यामध्ये २ ते ३ इंचाचे अंतर असावे. तसेच फ्रिजच्या दरवाजाला असणारे रबरी सिल वारंवार स्वच्छ करावे. उन्हाचा कवडसा येत असेल, अशा ठिकाणी फ्रिज ठेवणे टाळा. ८. टीव्ही बऱ्याचदा रिमोटनेच बंद केला जातो आणि त्याचा मेन स्विच मात्र चालूच राहतो. पण टीव्ही पाहून झाला की हा मुख्य स्विच पण बंद करावा. ९. इंडक्शन वापरत असाल तर ते खूप जास्त टेम्परेचर ठेवून वापरू नये. टेम्परेचर नेहमी मध्यम किंवा कमी स्वरुपाचे असावे.टॅग्स :सुंदर गृहनियोजनहोम अप्लायंसपैसावीजHomeHome ApplianceMONEYelectricity