Saree with jacket trend for winter wedding season, New fashion of saree draping with jacket
खास हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी 'साडी विथ जॅकेट'चा मस्त ट्रेण्ड, दिसा स्टायलिश-कुडकुडण्याचीही भीती नाही By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 1:14 PM1 / 8हिवाळ्यात रात्रीचे लग्न, रिसेप्शन असले की थंडी वाजून खूपच कुडकुडायला होतं. त्यामुळेच ही साडी विथ जॅकेटची खास हिवाळ्यासाठी असणारी फॅशन एकदा बघून घ्या. 2 / 8अशा पद्धतीने साडी आणि जॅकेट घालून कार्यक्रमाला गेलात तर थंडी वाजणार नाही. त्यामुळे कार्यक्रमही छान एन्जॉय करता येईल. शिवाय तुमच्या या स्टाईलमुळे तुम्ही अतिशय आकर्षक आणि चारचौघीत उठून दिसाल. 3 / 8एखाद्या रिसेप्शनसाठी जाणार असाल तर करिनाचा हा लूक पाहा.. एकदम स्टायलिश दिसाल.4 / 8फॉर्मल कार्यक्रमांसाठी, रिसेप्शनसाठी असा लूकही करता येईल. यामध्ये साडीचा पदर फक्त पुढच्या बाजुने वळवून घेतला आहे. 5 / 8एखाद्या लग्न समारंभासाठी असा सुंदर लूक करता येईल. त्यासाठी साडीवर मॅच होणारं असं भरजरी जॅकेट घ्या.6 / 8तापसी पन्नूसारखा असा लूकही लग्न समारंभासाठी छान दिसतो. यासाठी जॅकेटची निवड मात्र परफेक्ट जमून आली पाहिजे. ऑनलाईन शॉपिंग साईटवरही असे एम्ब्रॉयडरी केलेले, वर्क केलेले अनेक जॅकेट आहेत.7 / 8कतरिनाचा हा एक लूक पाहून घ्या... अशा पद्धतीचं जॅकेट शिवायचं असेल तर कॉन्ट्रास्ट रंगाचं जॅकेट शिवलं तरी चालेल. 8 / 8शिफॉन किंवा ऑर्गेंझा साडीवर असं ब्लेझरसारखा लूक देणारं जॅकेट तुम्ही रिसेप्शन, फॉर्मल मिटिंग किंवा मग ऑफिससाठीही घालू शकता. खास हिवाळ्यातल्या लग्नसराईसाठी 'साडी विथ जॅकेट'चा मस्त ट्रेण्ड, दिसाल स्टायलिश- थंडीही वाजणार नाही आणखी वाचा Subscribe to Notifications