ओपन पोर्समुळे चेहरा वयस्कर दिसतो? किचनमधला 'हा' पदार्थ लावा, डाग-पिंपल्स होतील कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 08:54 AM2024-06-06T08:54:04+5:302024-06-07T13:30:51+5:30

Skin Care Tips : मुल्तानी मातीत एंटी इफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे रोमछिद्र कमी होतात.

आजकालच्या धावपळीच्या जीवनात त्वचेशी संबंधित समस्या उद्भवणं खूपच कॉमन झालं आहे. ओपन पोर्स आणि पिंपल्समुळे चेहऱ्यावर काळे डाग येतात. पोर्स जास्त वाढल्यामुळे त्यात घाण शिरते आणि चेहरा तेलकट दिसतो. यामुळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटडेह्ट्सची समस्या उद्भवते.

त्वचेवर कोणतेही डाग किंवा रिएक्श दिसली तर सौंदर्यावर परिणाम होतो. वारंवार पिंपल्स येत राहिले तर चेहरा खराब होऊ शकतो. काही घरगुती उपायांचा वापर करून तुम्ही चेहरा उजळवू शकता

हळदीत एंटीइंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे डाग कमी होतात. पोर्स क्लिन होण्यास मदत होते. यासाठी सगळ्यात आधी एक वाटी घ्या त्यात १ मोठा चमचा हळदीची पावडर घाला, १ चमाच दूध घाला, अर्धा चमचा मध घालून पेस्ट एकत्र करा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनी सुकल्यानंतर चेहरा धुवा ज्यामुळे डाग आणि पोर्स कमी होतील.

त्वचेवर जास्त व्हाईटहेड्स, ब्लॅकहेड्स दिसत असतील तर नॅच्युरली रिमेडी म्हणजे वाफ घ्या. चेहऱ्यावर वाफ घेतल्यानने छिद्र स्वच्छ होतात. नंतर तुम्ही फेसवर मॉईश्चरायजर लावू शकता.

मुल्तानी मातीत एंटी इफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे रोमछिद्र कमीहोतात. हा उपाय करण्यासाठी १ मोठा चमचा दही, अर्ध्या लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. जवळपास १५ ते २० मिनिटं चेहऱ्याला लावून ठेवा त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

एप्पल साडर व्हिनेगरमध्ये एंटी बॅक्टेरियल आणि एंटी इंफ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे स्किन पोर्स साफ होतात. पण व्हिनेगरचं पाणी सावधगिरीने वापरायला हवं. १ग्लास पाण्यात टोनर मिसळून लावा. ज्यामुळे चेहरा स्वच्छ होईल.