शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Top 5 Causes of High Cholesterol : ४ सवयी सोडा, वाढलेले कोलेस्टेरॉल होईल झटपट कमी; रक्ताभिसरणही वाढेल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 5:34 PM

1 / 7
आजकाल कोलेस्टेरॉल (Cholesterol) ही एक गंभीर समस्या बनली आहे, ज्यामुळे अनेक लोक चिंतेत आहेत. उच्च कोलेस्टेरॉलला बर्‍याचदा 'सायलेंट किलर' (Silent Killer) म्हटले जाते. कारण त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. (Causes of High Cholesterol) उपचार न केल्यास, स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यासारख्या मोठ्या आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. (How to Control Cholesterol)
2 / 7
कोलेस्टेरॉल एक मेणयुक्त चरबी आहे जी शरीराच्या नसा किंवा शिरामध्ये जमा होते. हे खराब कोलेस्टेरॉल आहे, जे शिरांमध्ये जमा होते. यामुळे तुमच्या रक्ताभिसरणात घट होऊ शकते. ज्यामुळे तुम्हाला हृदयविकाराचा धोका वाढतो. आता प्रश्न असा आहे की कोलेस्टेरॉल कसे तयार होते, म्हणजेच ते रक्ताच्या नसांमध्ये कसे जमा होते. (Bad Cholesterol Control Tips)
3 / 7
रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी आणि बैठी जीवनशैली म्हणजेच शारीरिक श्रम न केल्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवतात. असे तज्ज्ञांचे मत आहे. (What is the main cause of cholesterol) कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अनेक लोक औषधे किंवा वेगवेगळ्या गोष्टी घेण्यास सुरुवात करतात. त्याशिवाय तुम्ही शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकू शकता. (What food causes high cholesterol)
4 / 7
एका संशोधनानुसार, चालणे आणि व्यायाम केल्याने सर्वसाधारणपणे कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे वजन कमी होऊ शकते. यामुळे शरीरातील LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी कमी होऊ शकते आणि HDL म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या मते, प्रत्येक आठवड्यात 150 मिनिटे चालणे कोलेस्ट्रॉल कमी करू शकते.
5 / 7
तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की धूम्रपान न केल्याने एचडीएल किंवा खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. धूम्रपानामुळे हृदयरोग आणि उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. तंबाखू एलडीएल (Bad cholesterol) वाढवते आणि एचडीएल (Good cholesterol) पातळी कमी करते.
6 / 7
एकतर अल्कोहोल कायमचे सोडून द्या किंवा अगदी कमी प्रमाणात सेवन करा. एका अभ्यासानुसार, अल्कोहोलच्या सेवनाने यकृताचे नुकसान होते आणि नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल वाढते. दारूचे सेवन हे अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचे मूळ आहे.
7 / 7
वजन वाढल्याने शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याचा धोकाही वाढतो. यासाठी तुम्ही गोड पेये सोडून द्यावीत. दररोज घेतल्या जाणार्‍या कॅलरीजचा रेकॉर्ड ठेवावा. दररोज व्यायाम करा किंवा काही शारीरिक हालचाली करा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यLifestyleलाइफस्टाइल