...अन् रहस्यमयरित्या चिमुकलीला बेडखाली खेचलं; वडिलांनी बघितला भीतीदायक CCTV फुटेज

By प्रविण मरगळे | Published: February 24, 2021 01:28 PM2021-02-24T13:28:38+5:302021-02-24T13:33:20+5:30

टिकटॉकवर एका युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्याला आतापर्यंत ७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केला आहे.

चिमुकली तिच्या बेडवर झोपली असताना रहस्यमयरित्या ती बेडच्या खाली गेली, ही संपूर्ण घटना मुलीच्या रूममध्ये लागलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली, जे पाहून वडील घाबरले

या घटनेनंतर हा व्हिडीओ टीकटॉकवर पोस्ट करण्यात आला, ज्यानंतर अनेक लोकांनी तुमच्या रूमची चावी त्या अदृश्य शक्तीच्या सुपूर्द करा आणि त्याठिकाणाहून निघून जा असा सल्ला दिला आहे.

टिकटॉक युजर @joshdean0222 यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय की, माझी मुलगी अचानक बेड खाली गेली, माझ्या पत्नीला वाटत होते, ती स्वत:हून चालत गेली असावी, परंतु कोणीतरी माझ्या मुलीला बेडखाली खेचून घेतलं.

मिररमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, @joshdean0222 ने या व्हिडीओ पोस्टमध्ये सांगितलंय की, माझ्या मुलीला बेडखाली खेचल्याची घटना रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी घडली, येथे काहीतरी अजब होत आहे, ही सर्वसामान्य घटना नाही. जेव्हा ही घटना घडली तेव्हा माझी मुलगी खेळण्यांसह बेडच्या एका कोपऱ्यात बसली होती.

व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर आतापर्यंत याला ८० लाख व्ह्यूज्स मिळाले आहेत, मुलीच्या वडिलांनी सांगितले की, सुरुवातीला माझी मुलगी बेडच्या खाली जाताना दिसली, परंतु काही वेळात ती घाबरली, आणि जोरजोरात रडू लागली, तिने आईला आवाज दिला. पाहा हा व्हिडीओ - https://twitter.com/MirrorWeirdNews/status/1364276082032193540

बेडच्या खाली कोणतीही हालचाल दिसली नाही, जो पाय बेडच्या खाली दिसतो तो गायब दिसला, या व्हिडीओला ७ लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स आणि २६ हजाराहून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत, सोशल मीडियावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत.

एकाने लिहिलंय की, मुलगी खूप घाबरली आहे, त्यामुळे ती बेडखाली गेली असेल, दुसरा सांगतो, असं होऊच शकत नाही, तिसऱ्याने मुलगी कशी आहे? तुमच्या पत्नीने तिचा आवाज ऐकला नाही का? असा प्रश्न केला, अनेकांना व्हिडीओ पाहून धक्का बसला.

या व्हिडीओत कमेंट्स करणाऱ्या एका युजरने भूत नसतं, मुलीचं खेळणं बेडखाली गेल्याने ती ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होती, परंतु ते बाहेर न आल्याने ती जोरजोरात रडू लागली आणि तिच्या आईला आवाज देऊ लागली, हा कॉमन सेन्स आहे असं म्हटलं आहे.

Read in English