क्या बात! लॉकडाऊनमुळे तब्बल 30 वर्षांनी पुन्हा दिसू लागले दुर्मीळ 'ब्लू ड्रॅगन', व्हायरल झाले फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 03:51 PM2020-05-12T15:51:25+5:302020-05-12T16:08:56+5:30

टेक्सासच्या पाद्रे आयलंड नॅशनल सीशोरवर हे दुर्मीळ ब्लूड ड्रॅगन (Blue Dragon) बघायला मिळत आहेत. एक दोन नाही तर हे जीव मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत.

जगभरात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे आणि याचा फार पर्यावरणावर फारच सकारात्मक प्रभाव बघायला मिळत आहे. प्रदूषण दूर झालं असून अनेक जीव नव्याने जगू लागले आहेत. असाच एक दुर्मीळ जीव आता पुन्हा आढळू लागला आहे. तो म्हणजे ब्लू ड्रॅगन.

टेक्सासच्या पाद्रे आयलंड नॅशनल सीशोरवर हे दुर्मीळ ब्लूड ड्रॅगन (Blue Dragon) बघायला मिळत आहेत. एक दोन नाही तर हे जीव मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत.

CNN च्या रिपोर्टनुसार, 7 वर्षाचा एक लहान मुलगा हंटर लेन याला चार असे ब्लू ड्रॅगन मिळाले होते. हंटरच्या आई-वडिलांनी सांगितले की, ते अॅरिझोनामध्ये राहतात आणि गेल्या रविवारी फिरताना त्यांच्या मुलाला हे ब्लू ड्रॅगन दिसले.

या परिसरात साधारण 30 हे ब्लूड ड्रॅगन 30 वर्षांआधी बघितले गेले होते. ज्या मुलाला हे ब्लूड ड्रॅगन मिळाले त्याला ते ब्लू जेलीफिश वाटले होते.

मुळात ब्लूड ड्रॅगन हे नावाप्रमाणे निळ्या रंगाचे फारच सुंदर स्लग आहेत. जे ड्रॅगनसारखे आढळून येतात. हे 3 सेंटीमीटरपर्यंत मोठे असतात आणि अटलांटिक, पॅसिफिक आणि इंडियन ओशियनमध्ये आढळतात.

हे जवळपास जगभरातून लुप्त झाले आहेत आणि कधीकधी आढळून येतात. आता पार्कने सूचना दिली आहे की, कुणाला हा जीव आढळला तर त्याची माहिती लगेच कळवा आणि त्याच्यापासून दूर रहा.

पार्ककडून सांगण्यात आले आहे की, लॉकडाऊनमुळे प्रदूषण कमी झालं आहे. ज्याचा हा परिणाम आहे की, ब्लू ड्रॅगनसारखे दुर्मीळ जीव पुन्हा दिसू लागले आहेत.

नंतर या परिवाराने दावा केला की, त्यांना नवीन पाण्यातील वेगळे जीव सापडले आहे. हे ड्रॅगन फारच दुर्मीळ आहेत आणि त्यांबाबत फार कमी लोकांना माहिती आहे.