२०२० या वर्षात इंटरनेट सेवा खंडीत केल्यानं कोट्यवधी लोकांना त्रास, भारत पहिल्या क्रमांकावर! By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2021 08:57 PM 2021-03-03T20:57:38+5:30 2021-03-03T21:07:03+5:30
Report on Internet Shutdown Around the World: जगभरातील कोट्यवधी लोक गेल्या वर्षी कोरोना व्हायरसमुळं इंटरनेटवर सर्वाधिक निर्भर झाले. लॉकडाऊनमुळे वर्क फ्रॉम होमचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं. पण याच वर्षात जगात सर्वाधिक वेळा इंटरनेट ठप्प पडण्याच्याही घटना घडल्या. याबाबत आपण माहिती जाणून घेऊयात.... 2020 या वर्षात जगभरात २९ देशांत जाणूनबुजून कमीत कमी १५५ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली किंवा इंटरनेटचा स्पीड कमी करण्यात आला होता.
डिजिटल राइट ग्रूप एक्सिस नाऊ यांनी याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार २०२० या वर्षात भारतात सर्वाधिकवेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
भारतात २०२० या वर्षात १०९ वेळा इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. यात सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.
भारतापाठोपाठ म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांमध्येही इंटरनेट सेवा बंद झाली होती.
म्यानमार हा देश सर्वाधिक कालावधीसाठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेला देश ठरला आहे. म्यानमार २०१९ पासूनच इंटरनेट सेवा खंडीत करण्याचं प्रकरण सुरू झालं ते अगदी २०२० सालापर्यंत सुरू होतं.
बांगलादेशात रोहिंग्यांच्या कॅम्प परिसरात ४१५ दिवसांपर्यंत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती.
इथिओपियामध्ये २ आठवड्यांपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. एकट्या इथिओपियामध्ये सलग दोन आठवडे तब्बल १० कोटी लोक इंटरनेटविना होते.