report on internet shutdown around the world 2020 india tops in all countries
२०२० या वर्षात इंटरनेट सेवा खंडीत केल्यानं कोट्यवधी लोकांना त्रास, भारत पहिल्या क्रमांकावर! By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2021 8:57 PM1 / 72020 या वर्षात जगभरात २९ देशांत जाणूनबुजून कमीत कमी १५५ वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली किंवा इंटरनेटचा स्पीड कमी करण्यात आला होता. 2 / 7डिजिटल राइट ग्रूप एक्सिस नाऊ यांनी याबाबतचा अहवाल प्रकाशित केला आहे. अहवालानुसार २०२० या वर्षात भारतात सर्वाधिकवेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 3 / 7भारतात २०२० या वर्षात १०९ वेळा इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. यात सर्वाधिक जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 4 / 7भारतापाठोपाठ म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांमध्येही इंटरनेट सेवा बंद झाली होती. 5 / 7म्यानमार हा देश सर्वाधिक कालावधीसाठी इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आलेला देश ठरला आहे. म्यानमार २०१९ पासूनच इंटरनेट सेवा खंडीत करण्याचं प्रकरण सुरू झालं ते अगदी २०२० सालापर्यंत सुरू होतं. 6 / 7बांगलादेशात रोहिंग्यांच्या कॅम्प परिसरात ४१५ दिवसांपर्यंत इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली होती. 7 / 7इथिओपियामध्ये २ आठवड्यांपर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. एकट्या इथिओपियामध्ये सलग दोन आठवडे तब्बल १० कोटी लोक इंटरनेटविना होते. आणखी वाचा Subscribe to Notifications