the 5 best budget apps to help your finances in order
खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी 'हे' अॅप्स करतील मदत By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2019 03:19 PM2019-06-05T15:19:04+5:302019-06-05T15:25:36+5:30Join usJoin usNext खर्च जास्त असल्याने महिन्याच्या शेवटी पैशाची बचत कमी होत असल्याची अनेकांची तक्रार असते. त्यामुळे महिन्याचं बजेट कोसळतं. मात्र असे काही अॅप्स आहेत ज्याच्या मदतीने आपण खर्चावर नियंत्रण मिळवू शकतो. मदत करणारे अनेक अॅप्स सध्या उपलब्ध असून मनी मॅनेजमेंटमध्ये मदत करतात. त्यासाठी सल्ला देतात. अशाच काही अॅप्सबाबत जाणून घेऊया.Mint Mint हे अॅप इंट्यूटने विकसित केलं असून मनी मॅनेजमेंटसाठी ते मदत करतं. या अॅपमध्ये खर्चावर लक्ष ठेवता येतं. बँक आणि क्रेडिट कार्ड अकाऊंटसोबत महिन्याची बिलं जोडता येतात. त्यामुळे पैशांच्या व्यवहारावर नजर राहते.Goodbudget बजेट अॅपमध्ये Goodbudget हे अॅप अत्यंत लोकप्रिय आहे. अँड्रॉईड, वेब आणि iOS वर या अॅपचा वापर करता येतो. कमवलेले पैसे आणि खर्च या दोन्हींची माहिती अॅपमध्ये असते.Moneymanager Moneymanager हे अॅप अत्यंत चांगलं असून ते खर्च करण्यात आलेल्या पैशावर नजर ठेवतंय या अॅपचं फ्री आणि पेड असं दोन्ही व्हर्जन उपलब्ध आहे. Monefy Monefy हे अॅप सर्वात सोप्या पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट अॅपपैकी एक आहे. या अॅपमध्ये सहज आणि वेगात नवीन डेटा अपलोड करता येते. तर जूना डेटा अपडेट करता येतो. Google Sheets Google Sheets अॅपच्या मदतीने इन्कम, खर्च आणि पैशांसंबंधित महत्त्वाच्या डेटाची माहिती ठेवू शकतो. हे एक फ्री अॅप असून गुगल प्ले स्टोरवरून डाऊनलोड करता येतं. टॅग्स :तंत्रज्ञानtechnology