शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कामाच्या ठिकाणी 'टिक टॉक' करताय? सावधान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 8:01 AM

1 / 7
भारतात टिक टॉकने कमालीची पाळेमुळे रोवली आहेत. मनोरंजना ऐवजी या अॅपवर प्रसिद्धीच जास्त मिळत असल्याने अनेकजण स्टंटबाजी करण्यात गुंतले आहेत. मात्र, हे अॅप बऱ्याचदा जीवघेणेही ठरलेले आहे.
2 / 7
तेलंगानामध्ये घडलेला किस्सा वाचून तुम्ही टिक टॉक कामाच्या ठिकाणी, कार्यालयात वापरताना विचार नक्की कराल.
3 / 7
तेलंगानातील खम्मम नगर निगममध्ये हा प्रकार घडला आहे. या कार्यालयातील 11 कर्मचाऱ्यांना टिक टॉक वापरणे चांगलेच भोवले आहे. कामकाजावेळी टिक टॉक आणि सोशल मीडिया वापरल्याच्या आरोपाखाली या कर्मचाऱ्यांना पदावरून काढून टाकले असून पगारही कमी केला आहे.
4 / 7
या कर्मचाऱ्यांना भविष्यात पुन्हा असे न करण्याची तंबी देण्यात आली आहे. केएमसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयुक्तांनी या 11 कंत्राटी कर्मचाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले असून त्यांचे पगारही कमी करण्यात आले आहेत. या कर्मचाऱ्यांमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही सहभागी आहेत.
5 / 7
तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ज्या व्हिडीओवरून कारवाई झाली आहे ते व्हिडीओ दोन महिने जुने आहेत. ते नजीकच्या काळात काढलेले नाहीत.
6 / 7
केएमसीच्या कार्यालयात हे कर्मचारी कामावेळी टिक टॉकवर व्हिडीओ काढणे आणि सोशल मीडियावर चॅटींग करताना पकडले गेले आहेत. यातील काही जण लिपिक तर काही जण फिल्डवर काम करतात.
7 / 7
या कर्मचाऱ्यांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते, तर काही व्हिडीओ टीव्ही चॅनल्सवरही दाखविण्यात आले होते.
टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकEmployeeकर्मचारी