शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

BSNL ग्राहकांसाठी खुशखबर! आता छोट्या प्लॅनमध्ये 4000GB हायस्पीड डेटा मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 12:06 PM

1 / 6
सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही दूरसंचार क्षेत्रातील सर्वात जुनी कंपनी आहे. जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत बीएसएनएलकडे ग्राहकांची संख्या कमी असली तरी, कंपनी आपल्या प्लॅन्ससह सर्वांना टक्कर देताना दिसून येते. बीएसएनएलच्या यादीत अनेक शानदार प्लॅन्स आहेत. बीएसएनएलने आता आपल्या ८ कोटींहून अधिक ग्राहकांसाठी एक उत्तम ऑफर आणली आहे.
2 / 6
दरम्यान, बीएसएनएल आपल्या ग्राहकांना प्रीपेड आणि पोस्टपेड तसेच ब्रॉडबँड सेवा प्रदान करते. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी ब्रॉडबँडमध्ये धमाकेदार ऑफर आणली आहे. कंपनीने आपला एक स्वस्त प्लॅन अपग्रेड केला असून आता ग्राहकांना कमी किमतीत हाय स्पीड इंटरनेटची सुविधा मिळणार आहे.
3 / 6
जर तुमच्याकडे बीएसएनएलचे ब्रॉडबँड कनेक्शन असेल तर आता तुम्हाला हाय स्पीड डेटासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. आता तुम्हाला ५९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये पूर्वीपेक्षा अनेक पटीने जास्त सुविधा मिळणार आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त डेटा आणि जास्त इंटरनेट स्पीड मिळेल.
4 / 6
बीएसएनएलद्वारे ब्रॉडबँड कनेक्शन असलेल्या ग्राहकांसाठी ५९९ रुपयांची फायबर बेसिक प्लस योजना २०२० मध्ये लॉन्च करण्यात आली होती. या प्लॅनमध्ये कंपनी ६० एमबीपीएसच्या स्पीडने डेटा देत असे. ग्राहक एका महिन्यात ३.३ टीबी डेटा वापरू शकतात. डेटा मर्यादा संपल्यानंतर ग्राहक २ एमबीपीएसच्या स्पीडने डेटा वापरू शकतात.
5 / 6
बीएसएनएलच्या ५९९ रुपयांच्या ब्रॉडबँड प्लॅनच्या सुविधा आता पूर्णपणे अपग्रेड करण्यात आली आहेत. जर तुम्ही हा प्लॅन घेतला तर आता तुम्हाला ७५ एमबीपीएसचा स्पीड मिळेल तर आता तुम्ही संपूर्ण महिन्यात ३.३ टीबी ऐवजी ४००० जीबी डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंगची सुविधाही मिळते.
6 / 6
या स्वस्त हाय स्पीड इंटरनेट डेटा प्लॅनमध्ये ग्राहकांच्या मनोरंजनासाठी बीएसएनएल आपल्या ग्राहकांना Disney + Hotstar Super चे सबस्क्रिप्शन देखील देत आहे. जर तुम्ही असा प्लॅन शोधत असाल ज्यामध्ये तुम्हाला हाय स्पीड डेटा, कॉलिंग तसेच OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल, तर बीएसएनएलचा ५९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लॅन ग्राहकांसाठी सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
टॅग्स :BSNLबीएसएनएलtechnologyतंत्रज्ञान