Buy Smartphones From These Brands If You Don't Want To Buy Made In China Devices
'मेड इन चायना' नको तर मग 'या' ब्रँडचे खरेदी करू शकता स्मार्टफोन By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 5:35 PM1 / 8आपल्याला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे. पण, तो चिनी ब्रँडचा घ्यायचा नसेल तर मार्केटमध्ये अने ऑप्शन आहेत. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये सर्वात मोठा वाटा शाओमी, रियलमी, ओप्पो आणि व्हिवो सारख्या चिनी ब्रँडचा आहे. मात्र, इतर कंपन्याही वेगवेगळ्या किंमतींवर जोरदार स्मार्टफोन देत आहेत. यासंदर्भात आम्ही काही यादी देत आहोत. यामधील ब्रँड चीनमधील नाहीत.2 / 8दक्षिण कोरियाचा ब्रँड असलेले सॅमसंग स्मार्टफोन जगभरातील मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. सॅमसंग सर्व किंमतीच्या विभागांमध्ये स्मार्टफोन लॉन्च करतो. भारताच्या मोबाईल मार्केटमध्ये सुद्धा सॅमसंगचा मोठा वाटा आहे. सॅमसंगचे फ्लॅगशिप फोन ते बजेट फोनपर्यंत खरेदी करता येतात.3 / 8आयफोन तयार करणारी कंपनी कॅलिफोर्नियाची आहे. या कंपनीचे प्रीमियम डिव्हाइसेसचे जगभरात मोठे मार्केट आहे. आपण प्रीमियम डिव्हाइस खरेदी करू इच्छित असल्यास, आपण आयफोन देखील खरेदी करू शकता. अलीकडे, स्वस्तातील iPhone लॉन्च करण्यात आला आहे.4 / 8नोकिया आणि एचएमडी ग्लोबल या दोन्ही फिनलँडच्या कंपन्या आहेत. नोकियाद्वारे सर्वोत्कृष्ट बजेट आणि मिडरेंज डिव्हाइस लाँच केले जात आहेत. नोकिया हा अँड्रॉइड वनचा एक भाग आहे, ज्याचा अर्थ असा आहे की त्याच्या डिव्हाइसला 2 वर्षांसाठी गारंटीड अपडेट्स मिळतात.5 / 8मोटोरोला ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि जवळजवळ सर्व किंमतीच्या सेगमेंट्समध्ये स्मार्टफोन ऑफर केले जातात. कंपनीने अलीकडेच आपली नवीन फ्लॅगशिप सीरीज भारतात आणली आहे. याशिवाय, मिडरेंज आणि बजेट मोटोरोला डिव्हाइस खरेदी करता येतील.6 / 8तैवानची कंपनी आसुसकडून भारतात उत्कृष्ट स्मार्टफोन ऑफर केले जातात. पॉवररेंज या कंपनीच्यावतीने मिडरेंज विभाग आणि प्रीमियम विभागात बॅटरी आणि प्रोसेसर डिव्हाइसची ऑफर करत आहे. आसुस फ्लिप कॅमेर्यासारखे इनोव्हेशन्स सुद्धा करत आहे.7 / 8जर आपल्याला प्रीमियम सेगमेंटमध्ये डिव्हाइस खरेदी करायचे असतील तर सर्वोत्कृष्ट Android एक्सपीरियंस Google पिक्सेल सीरीजचा डिव्हाइस मिळू शकतो. गुगल ही एक अमेरिकन कंपनी आहे आणि भारतीय बाजारात परवडणारे पिक्सल फोनदेखील ऑफर केले जातात.8 / 8साऊथ कोरोयाचा ब्रँड असलेल्या एलजी कंपनीची अनेक डिव्हाइसेस भारतीय मोबाईल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. ड्युअल स्क्रीन सारख्या इनोव्हेशन्स घेऊन, कंपनीने फ्लॅगशिप ThinQ डिव्हाइस भारतात आणला आहे. या स्मार्टफोनशिवाय मिडरेंज डब्ल्यू-सीरिजची बरीच डिव्हाइसेस सुद्धा ऑफर केली आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications