China's dragon CHINA MOBILE set to launch in telecom sector OF INDIA
टेलिकॉम क्षेत्रात चीनचा ड्रॅगन शिरकाव करण्याच्या तयारीत; पुन्हा 'स्वस्ताई'चे दिवस येणार? By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 9:11 PM1 / 9देशात मध्यंतरी स्वदेशी वस्तू, स्वदेशी सेवांचे वारे वाहू लागले होते. चीनी वस्तूंपासून आपण कितीही म्हटले तरीही दूर जाऊ शकत नाही. अगदी छोट्या छोट्या खेळण्यांपासून ते महागड्य़ा टीव्ही, मोबाईलपर्यंत चीनच्या कंपन्यांनी भक्कमपणे पाय रोवले आहेत. आता तर वाहन क्षेत्रातही चीनच्या कंपन्यांनी एन्ट्री केली आहे. याच वर्षी आणखी दोन कंपन्या भारतात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर टेलिकॉम क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे. 2 / 9चीनची मोठी कंपनी 'चायना मोबाईल' भारतात नेटवर्कचे जाळे विणण्याच्या तयारीत आहे. यामुळे जिओसह एअरटेल, व्होडाफोन या कंपन्यांना मोठा झटका बसणार आहे. 3 / 9तीन वर्षांपूर्वी जिओने सर्व स्वस्त करून खळबळ उडवून दिली होती. मात्र, नंतर परवडत नसल्याने सर्वच कंपन्यांनी दर वाढविले होते. आत पुन्हा ते दिवस परतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.4 / 9पण चायना मोबाईल यासाठी तगडा गडी शोधत आहे. 5 / 9ही कंपनी व्होडाफोन, एअरटेल यांच्याशी चर्चा करत असून त्यांच्या मदतीने क्लाऊड नेटवर्क तयार करणार आहे. या कंपन्यांच्या सहकार्याने चायना मोबाईल भारतात पाय रोवणार आहे. 6 / 9याचाच अर्थ ही कंपनी एअरटेल आणि व्होडाफोनसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे आणि त्यांचे व्यवस्थापनही हीच कंपनी सांभाळणार आहे. 7 / 9खरेतर जिओमुळे या दोन्ही कंपन्या नामोहरम झाल्या आहेत. गेल्या तिमाहीतील तोटा पाहता या कंपन्यांना खरेच टेकूची गरज आहे. हीच संधी चायना मोबाईलने साधली आहे. 8 / 9चायना मोबाईल ही चीनची सर्वात मोठी कंपनी आहे. तिच्याकडे 93 कोटी मोबाईल ग्राहक आहेत. तर वायरलाईनचे 17 कोटी ग्राहक आहेत. ही संख्या जवळपास भारताच्या लोकसंख्येएवढी होते.9 / 9चायना मोबाईल ही कंपनी डेटा सर्व्हिस, वायरलेस डेटा ट्रॅफिक सर्व्हिस, मोबाईल डेटा सोल्यूशन आणि कन्सल्टिंग सारख्या सेवा पुरविते. आणखी वाचा Subscribe to Notifications