CoronaVirus Google Maps New Feature Will Help Users To Be Safe From Covid 19 Infection
CoronaVirus News: लय भारी! आता गुगल मॅप कोरोनापासून वाचवणार; 'सेफ' मार्ग दाखवणार By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 09:10 PM2020-06-10T21:10:07+5:302020-06-10T21:13:52+5:30Join usJoin usNext देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातच आता अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्यानं रस्त्यांवरील वर्दळ वाढली आहे. रस्त्यावरील वाहतूक, लोकांची ये-जा वाढल्यानं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीतीही वाढली. त्यामुळे गुगलनं त्यांच्या मॅप्स सर्व्हिसमध्ये एक नवं आणि खास फीचर आणलं आहे. गुगल मॅप्समधील नव्या फीचरमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरक्षित प्रवास करण्यास मदत होईल. हे फीचर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावं यासाठी अपलोड रोलआऊट केलं जात आहे. अनेक देशांमध्ये नवं फीचर अपडेट झाल्यानं वापरकर्त्यांना टेस्ट सेंटरच्या लोकेशन्सची आणि कोविड-१९ बॉर्डर चेक्सची माहिती मिळू लागली आहे. भारतात अद्याप रेल्वे सेवा सुरू झालेली नाही. मात्र नव्या फीचरमुळे अनेक देशांमधील गुगल मॅप्सच्या वापरकर्त्यांना रेल्वे स्थानकांमध्ये नेमकी किती गर्दी आहे, याची माहिती उपलब्ध होत आहे. रेल्वे स्थानकातील गर्दीची माहिती उपलब्ध होत असल्यानं प्रवास करायचा का, प्रवास करण्याची वेळ बदलायची का, की प्रवासासाठी इतर पर्याय निवडायचा, याचा निर्णय घेणं वापरकर्त्यांना शक्य होत आहे. कंपनीनं एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून गुगल मॅप्समधील नव्या अपडेटची माहिती दिली. एँड्रॉईडसोबतच आयओएसवरदेखील नवीन अपडेट उपलब्ध आहे. नव्या अपडेटमुळे वापरकर्त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचता येईल, असा विश्वास गुगलनं व्यक्त केला. तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल, तर त्या ठिकाणी असलेली गर्दी गुगल मॅप्सच्या माध्यमातून जाणून घ्या. त्यामुळे कोरोनापासून शक्य तितकं दूर राहणं शक्य होईल, असं गुगलनं ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारतासह अर्जेंटिना, फ्रान्स, नेदरलँड, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये गुगल मॅप्समध्ये लवकरच नवं फीचर उपलब्ध होईल. बाकीच्या देशांमध्ये हे फीचर उपलब्ध होणार का, याबद्दल अद्याप तरी गुगलनं कोणतीही माहिती दिलेली नाही.Read in Englishटॅग्स :कोरोना वायरस बातम्यागुगलcorona virusgoogle