शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: लय भारी! आता गुगल मॅप कोरोनापासून वाचवणार; 'सेफ' मार्ग दाखवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 9:10 PM

1 / 10
देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यातच आता अनलॉकचा पहिला टप्पा सुरू झाल्यानं रस्त्यांवरील वर्दळ वाढली आहे.
2 / 10
रस्त्यावरील वाहतूक, लोकांची ये-जा वाढल्यानं कोरोनाचा संसर्ग होण्याची भीतीही वाढली. त्यामुळे गुगलनं त्यांच्या मॅप्स सर्व्हिसमध्ये एक नवं आणि खास फीचर आणलं आहे.
3 / 10
गुगल मॅप्समधील नव्या फीचरमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुरक्षित प्रवास करण्यास मदत होईल. हे फीचर वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावं यासाठी अपलोड रोलआऊट केलं जात आहे.
4 / 10
अनेक देशांमध्ये नवं फीचर अपडेट झाल्यानं वापरकर्त्यांना टेस्ट सेंटरच्या लोकेशन्सची आणि कोविड-१९ बॉर्डर चेक्सची माहिती मिळू लागली आहे.
5 / 10
भारतात अद्याप रेल्वे सेवा सुरू झालेली नाही. मात्र नव्या फीचरमुळे अनेक देशांमधील गुगल मॅप्सच्या वापरकर्त्यांना रेल्वे स्थानकांमध्ये नेमकी किती गर्दी आहे, याची माहिती उपलब्ध होत आहे.
6 / 10
रेल्वे स्थानकातील गर्दीची माहिती उपलब्ध होत असल्यानं प्रवास करायचा का, प्रवास करण्याची वेळ बदलायची का, की प्रवासासाठी इतर पर्याय निवडायचा, याचा निर्णय घेणं वापरकर्त्यांना शक्य होत आहे.
7 / 10
कंपनीनं एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून गुगल मॅप्समधील नव्या अपडेटची माहिती दिली. एँड्रॉईडसोबतच आयओएसवरदेखील नवीन अपडेट उपलब्ध आहे.
8 / 10
नव्या अपडेटमुळे वापरकर्त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचता येईल, असा विश्वास गुगलनं व्यक्त केला.
9 / 10
तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असाल, तर त्या ठिकाणी असलेली गर्दी गुगल मॅप्सच्या माध्यमातून जाणून घ्या. त्यामुळे कोरोनापासून शक्य तितकं दूर राहणं शक्य होईल, असं गुगलनं ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.
10 / 10
भारतासह अर्जेंटिना, फ्रान्स, नेदरलँड, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये गुगल मॅप्समध्ये लवकरच नवं फीचर उपलब्ध होईल. बाकीच्या देशांमध्ये हे फीचर उपलब्ध होणार का, याबद्दल अद्याप तरी गुगलनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoogleगुगल