CoronaVirus Marathi News here is how to tweet offline when internet is down SSS
CoronaVirus : लॉकडाऊनमध्ये इंटरनेट स्लो आहे? असं करा ऑफलाईन Tweet By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2020 2:18 PM1 / 10इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. मात्र अनेकदा काही जणांना स्लो इंटरनेटचा सामना करावा लागत आहे.2 / 10लॉकडाऊनमध्ये लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांशी कनेक्ट होत आहेत. ट्विटरचाही वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो.3 / 10मदतीसाठी, तक्रार करण्यासाठी प्रामुख्याने ट्विटरचा वापर हा करता येतो. तसेच संबंधित व्यक्तीला टॅग करण्याची देखील सुविधा देण्यात आलेली असते.4 / 10अनेकदा स्लो इंटरनेटमुळे अडचणी निर्माण होतात. मात्र याच दरम्यान युजर्स ऑफलाईन ट्विट करू शकतात.5 / 10ऑफलाईन ट्विट करण्यासाठी ट्विटर अकाऊंटसोबत आपला फोन नंबर लिंक असणं गरजेचं आहे 6 / 10ट्विटरचा शॉर्ट कोड माहीत असणं देखील महत्वाचं आहे. भारतात 9248948837 हा ट्विटरचा शॉर्ट कोड आहे.7 / 10ट्विटच्या सपोर्ट पेजवरून युजर 9248948837 या क्रमांकावर मेसेज करून ट्विटरवरचे मेसेज रिसिव्ह करू शकतात.8 / 10जो मेसेज टाईप करायचा आहे अथवा जे ट्विट करायचे आहे ते टाईप करून 9248948837 या क्रमांकावर पाठवा त्यानंतर ते ट्विट तुमच्या अकाऊंट वरून पोस्ट केलं जाईल.9 / 10भारतात लॉकडाऊन सुरू असताना इंटरनेट डेटा स्पीड कमी होतो. वर्क फ्रॉम होम हे या मागचं कारण असल्याचं म्हटलं जात आहे.10 / 10लॉकडाऊनमध्ये व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिसचा वापरही वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक एकमेकांशी संवाद साधत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications