शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अलर्ट! पुन्हा एकदा लीक झाला Facebook युजर्सचा डेटा, फोन नंबर्सचाही समावेश; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 2:50 PM

1 / 15
सोशल मीडिया वेबसाईट फेसबुकचे 533 मिलियन म्हणजेच 53.30 कोटीहून जास्त लोकांचे डिटेल्स लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टमधून समोर आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक माहिती ही रिपोर्टमधून समोर आली आहे.
2 / 15
नव्या रिपोर्टनुसार, 533 मिलियन म्हणजेच 53.30 कोटी युजर्सचे फोन नंबर्स आता लीक झाले आहेत. सायबर सिक्योरिटी फर्म मदरबोर्डच्या निकषांवर आधारीत व्हाइसच्या एक रिपोर्टनुसार, टेलिग्राम टूल्सच्या मदतीने हा डेटा लीक झाल्याची शक्यता आहे.
3 / 15
टेलिग्राम बॉटसारखा दिसत असलेला टेलिग्राम टूल, युजर्संना पसंत पडत असलेल्या एका विशिष्ट पेजसंबंधी नंबर शोधण्यासाठी पेमेंट करण्यास सांगितले जात आहे. मदरबोर्डचा दावा आहे की, त्यांनी टूलला व्हेरिफाय केले आहे
4 / 15
सध्या 533 मिलियन युजर्सच्या डेटाबेस नंबर्सचा डेटाबेस वेगळा आहे. म्हणजेच दोन वेगवेगळे डेटाबेस हे लीक झाले आहे. या नवीन डेटासेटमध्ये नंबरचा समावेश आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, बॉटसाठी एक विवरण देण्यात आले आहे.
5 / 15
ज्यामध्ये बॉट फेसबुकला पसंत करणाऱ्या युजर्संना फोन नंबर देते. फेसबुकवर हजारो लाईक्स असलेल्या पेजची किंमत काही डॉलर असू शकते. बॉटचा वापर करण्यासाठी युजर्संना फेसबुक पेजचे युनिक आयडेंटिफिकेशन कोडला ओळखणं गरजेचं आहे.
6 / 15
मदरबोर्डने दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना त्या कोडला बॉटमध्ये नोंद केल्यानंतर त्यांना डेटाची किंमत सांगितली जाते. तसेच खरेदीचा पर्याय देखील दिला जातो. फेसबुक पेजेसवर 100 लाईक्स आहे. त्यांचा डेटा बॉट फ्री मध्ये देत आहे.
7 / 15
एका स्प्रॅडशीटमध्ये हा डेटा बनवला आहे. ज्यामध्ये युजर्सचं पूर्ण नाव, फोन नंबरच्या माहितीचा समावेश आहे. तसेच बॉट आवश्यक रुपात त्या सर्व युजर्संचा डेटा प्रदान करीत नाही. जे पेज लाईक करते. 50 लाईक पेजसाठी बॉटने 10 युजर्ससाठी एक स्प्रेडशीट बनवली आहे.
8 / 15
फेसबुकच्या 533 मिलियन युजर्संचा डेटा हा याआधी लीक झाला होता. या डेटात जवळपास 106 देशात युजर्संचा डेटाचा समावेश आहे. यात 32 मिलियन डेटा अमेरिका युजर्स, 11 मिलियन ब्रिटनच्या युजर्सचा तर 6 मिलियन भारतीय युजर्सच्या डेटाचा समावेश आहे.
9 / 15
फेसबुकच्या इतिहासात सर्वात मोठा डेटा ब्रीच झाला आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, फेसबुकचे युजर्सचा हॅक केलेला डेटा ऑनलाईन फ्री मध्ये उपलब्ध करण्यात आला होता. याने सर्वांनाच धक्का बसला होता.
10 / 15
युजर्सच्या खासगी डेटामध्ये जन्म तारीख, संपूर्ण नाव, लोकेशन, आणि ईमेलचा समावेश आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचा फोन नंबर आणि खासगी माहिती सुद्धा या डेटात लीक झाल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 15
फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. फेसबुकचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. आता फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण फेसबुकने आणखी एक भन्नाट फीचर लाँच केलं आहे.
12 / 15
फेसबुकवर अनेकदा एखादी पब्लिक पोस्ट केल्यानंतर खूप जण त्यावर कमेंट करतात. त्यामध्ये काही असे लोक असतात, ज्यांनी कमेंट केलेलं आपल्याला अजिबात आवडत नाही. मग तेव्हा आपण अशा लोकांना सरळ ब्लॉक करतो.
13 / 15
आपल्या पोस्टवर कोणत्या व्यक्तीने कमेंट करावी आणि कोणी करू नये हे आता युजर्सना ठरवता येणार आहे. तसेच फेसबुक युजर्सला फीड फिल्टर बारचा उपयोग करुन आपल्या न्यूज फीड सॉर्ट करण्याचा आणि ब्राउज करण्याचाही पर्याय मिळेल.
14 / 15
फेसबुक एक न्यूज फीड फिल्टर बार आणणार आहे. जो न्यूज फीडमध्ये दिसेल. ज्यात युजरला लेटेस्ट न्यूज फीड पाहणं आधी पसंत आहे, की रॅकिंगच्या हिशोबाने न्यूज फीड पाहणं पसंत असेल हा पर्याय मिळेल.
15 / 15
Who Can Follow Me वर जा आणि येथे Public सिलेक्टेड आहे का हे तपासा. त्यानंतर Public Post Comments वर क्लिक करा. युजरने येथे कोणाला कमेंट करण्यासाठी परवानगी द्यावी ते ठरवायाचं आहे. या सेटिंगनंतर तुम्ही परवानगी दिलेल्या लोकांनाच तुमच्या पब्लिक पोस्टवर कमेंट करता येईल.
टॅग्स :FacebookफेसबुकIndiaभारतMark Zuckerbergमार्क झुकेरबर्ग