शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Google Maps मध्ये मोठा बदल होणार; आता Fastest Route नाही तर 'हा' रुट दाखवला जाणार, जाणून घ्या नेमकं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 3:11 PM

1 / 8
गुगल मॅप्सचा वापर हा प्रामुख्याने लोकेशन शोधण्यासाठी केला जातो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी गुगल मॅपची खूप मदत होते. आपल्या युजर्ससाठी ते सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतात.
2 / 8
एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचायचं असल्यास अनेकदा फास्ट रुट पाहिला जातो. त्यानुसार काही जण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचतात. मात्र आता गुगल आपलं अत्यंत लोकप्रिय असलेल्या Google Maps मध्ये महत्त्वाचा बदल करणार आहे.
3 / 8
Google Maps वरील Fastest route आता जाणार आहे. या बदलाचा युजरवर परिणाम होणार असल्याचं म्हटलं आहे. गुगल मॅपने आपल्या नेविगेशनची पद्धत बदलली आहे. युजर्स गुगल मॅपमध्ये रुट सिलेक्ट करून ड्राईव्ह करतात. त्यात आता बदल होणार आहे.
4 / 8
Autoevolution रिपोर्टनुसार, गुगल आता आपल्या अल्गोरिदममध्ये बदल करणार आहे. त्यामुळे गुगल मॅपमध्ये अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. एका ठिकाणातून दुसरीकडे जायचं असल्यास सर्वात फास्ट रुट दाखवला जातो.
5 / 8
जर युजरने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मॅप सुरू केल्यानंतर, गुगल सर्वात वेगवान मार्ग अर्थात फास्टेस्ट रुट दाखवायचा आणि युजर्स आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचायचे. मात्र आता कंपनीने यात बदल केला आहे. त्यामुळे आता गुगल मॅप्स फास्टेस्ट रुट दाखवणार नाही.
6 / 8
रिपोर्टनुसार, या वर्षी कंपनी एक अपडेट आणणार आहे, ज्यामध्ये फास्टेस्ट रुट दिसणार नाही. त्याशिवाय नेव्हिगेशन अ‍ॅप असा रस्ता दाखवेल, ज्यामध्ये युजर गाडीतील इंधनाची बचत करू शकेल.
7 / 8
गुगलचं हे नवं अल्गोरिदम इंधन वापरावर लक्षकेंद्रित करुन तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे आता ते वेळेच्या जागी इंधनाच्या बचतीवर लक्ष देणार आहे. रुट सिलेक्शन हे अनेक गोष्टींवर अवलंबून असणार आहे.
8 / 8
रिपोर्टमध्ये युजर हवं असल्यास सर्वात फास्ट रुट पाहू शकतो. याचा पर्याय त्या दिला जाईल. मात्र डिफॉल्टमध्ये गुगल मॅप्स कमीत कमी इंधन लागेल असा मार्गच सर्वात आधी दाखवणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान