शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

YouTube'च्या कमाईनतून 40 लाखांचे फेडले कर्ज; या व्यक्तीप्रमाणे तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 4:26 PM

1 / 7
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. पण, सध्या सोशल मीडियावर पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. YouTube हे एक व्यासपीठ आहे तिथे तुम्हाला सर्व प्रकारचे व्हिडिओ मिळतात. पण इथे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहू शकत नाही तर कमाई देखील करू शकता. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही दरमहा लाखो रुपये कमवू शकता.
2 / 7
एका अहवालानुसार, एका व्यक्तीने यूट्यूबवरून मोठी कमाई केली आहे. या व्यक्तीने त्याचे 40 लाखांचे कर्ज फेडले आहे. तुम्हीही YouTube द्वारे कसे कमाई करू शकता.
3 / 7
ब्रिटनमध्ये राहणारा अर्जुन योगन अस या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या घरात कमावणारे कोणी नव्हते. आई आजारी असताना वडील कामावर जाऊ शकत नव्हते. या प्रकरणात त्याच्यावर 40 लाखांचे कर्ज झाले होते. पहिल्यांदा या व्यक्तीने एक व्हिडिओ बनवला. पण नंतर त्याला व्हिडीओ बनवण्यात जास्त रस निर्माण झाला.
4 / 7
या व्यक्तीने यूट्यूबवर सतत व्हिडिओ शेअर केले.यानंतर पूर्णवेळ म्हणून काम सुरू केले. यात त्याने इतके पैसे कमावले की त्याने त्याचे सर्व कर्ज फेडले. अर्जुनने लंडनमध्ये एक पेंटहाऊस आणि बीएमडब्ल्यू कारही खरेदी केली आहे.
5 / 7
यूट्यूबवर व्हिडिओ बनवून तुम्हीही मोठी कमाई करू शकता. तुम्हाला फक्त सतत व्हिडिओ पोस्ट करावे लागतील. तुमच्या व्हिडिओंचा विषयही वेगळा असला पाहिजे. तुमच्या चॅनेलची प्रगती पाहून तुम्हाला पैसे मिळतात. यूट्यूबवर कमाई संदर्भात काही नियम देखील केले आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे.
6 / 7
YouTube व्हिडिओवर येणाऱ्या जाहिरातींमधून तुम्हाला जास्त पैसे मिळू शकतात.यात रकमेची मर्यादा आहे. जेव्हा तुम्ही त्यावर पोहोचता तेव्हा तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे मिळू लागतात.
7 / 7
कंपनीने याबाबत अनेक घोषणा केल्या आहेत. यासह बोनसही दिले जातात . लोकांना विचारानुसार पैसे दिले जातात. यातून तुम्ही 10 हजार डॉलर्सपर्यंत कमवू शकता.
टॅग्स :YouTubeयु ट्यूबSocial Mediaसोशल मीडिया