शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जिओचे JioPOS Lite लॉन्च; प्रीपेड नंबर रिचार्ज करा अन् कमवा पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 5:38 PM

1 / 8
उद्योगपती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने एक नवीन रिचार्ज अॅप JioPOS Lite लाँच केले आहे.
2 / 8
आता सुद्धा तुम्ही अॅप किंवा जिओच्या वेबसाइटवरून कोणाचेही प्रिपेड सिम रिचार्ज करु शकता. मात्र, यासाठी कमिशन दिले जात नाही.
3 / 8
JioPOS Lite साठी युजर रजिस्ट्रेशनची गरज असते. दरम्यान, रजिस्ट्रेशनसाठी हार्ड कॉपी डॉक्युमेंट्सची गरज लागणार नाही. अॅपमध्येच आपल्याला आवश्यक ती माहिती भरावी लागणार आहे.
4 / 8
JioPOS Lite अॅपमध्ये रजिस्टर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे फिजिकल व्हेरिफिकेशन करावे लागत नाही. JioPOS Lite अॅपच्या माध्यमातून जर तुम्ही रजिस्टर केले आहे, तर कंपनी दुसऱ्याचे सिम रिचार्ज केल्याप्रकरणी ४.१६ टक्के कमिशन देईल.
5 / 8
या अॅपमध्ये पासबुक फीचर दिले आहे. ज्यातून जिओ पार्टनर्स आपली कमाई आणि ट्रांजक्शन पाहू शकतात. तसेच, या अॅपला गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करता येऊ शकते.
6 / 8
हे अॅप डाऊनलोड केल्यानतंर आपल्याला रजिस्टर करण्यासाठी याचा मेंबर बनण्यास सांगिले जाईल. यासाठी आपल्याजवळ जिओचा नंबर असणे गरजेचे आहे.
7 / 8
JioPOS Lite अॅपमध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला या अॅपसाठी वॉलेटमध्ये पैसे भरण्यास सांगितले जाईल. येथून तुम्ही ५०० रुपये, १००० रुपये आणि २००० रुपये आपल्या वॉलेटमध्ये अॅड करु शकता.
8 / 8
कंपनीच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या व्यक्तीच्या फोनमध्ये १०० रुपयांचे रिचार्ज केले तर ४.१६६ रुपये कमवू शकता.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानJioजिओReliance Jioरिलायन्स जिओ