शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Fraud Alert: मोबाईल हरवला तर आधी 'हे' काम करा, अन्यथा तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 5:00 PM

1 / 8
आजकाल प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असतो. मोबाईल आणि इंटरनेट सध्या आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. स्मार्टफोनद्वारे आपण Paytm, PhonePe, UPI यासारखे अॅप्स वापरतो. या कारणास्तव, हे सर्व अॅप्स मोबाइलमध्ये लॉग इन करून ठेवलेले असतात.
2 / 8
अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल फोन (Mobile Phone) हरवला तर मोठा त्रास होऊ शकतो. अशा वेळी अनेकदा काय करावे हेच समजत नाही. जर मोबाईल चुकीच्या हातात गेला तर तो खूप नुकसान करू शकतो.
3 / 8
तुमच्यासोबतही असे काही घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही. तुमचा मोबाईल फोन हरवताच काही आवश्यक पावले उचला. त्यामुळे बँकेत जमा केलेले पैसे सुरक्षित राहतील. चला तर मग जाणून घेऊया त्या पद्धतींबद्दल...
4 / 8
स्मार्टफोन चोरीला गेल्यास (Smartphone Lost) किंवा गहाळ झाल्यास सर्वात आधीत तुमही त्यामधील सिम कार्ड ब्लॉक करा. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे फसवणूक करणारे लोक तुमच्या OTP किंवा इतर कोणत्याही आर्थिक माहितीचा फायदा घेऊ शकणार नाहीत.
5 / 8
सिम ब्लॉक केल्यानंतर, तुम्ही कंपनीकडून दुसरे सिम मागवून नंबर वापरणे सुरू ठेवू शकता. परंतु, इतर कोणतीही व्यक्ती तुमच्या सिमचा गैरवापर करू शकणार नाही.
6 / 8
मोबाईल हरवल्यानंतर, सर्वप्रथम तुमच्या बँकेशी संपर्क करून तुमची इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग सेवा (Mobile Banking Seva)बंद करा. याशिवाय, तुम्ही UPI पेमेंट देखील बंद करावे. या सर्व गोष्टींसाठी तुम्ही कंपनीच्या कस्टमर केअरशी (Customer Care) संपर्क साधू शकता.
7 / 8
तुम्ही Amazon Pay, Freecharge, Paytm, PhonePe इत्यादींच्या वॉलेटमध्ये पैसे ठेवले असतील तर ते सर्व लवकरात लवकर बंद करा. फोन चुकीच्या हातात पडला तर ती व्यक्ती तुमच्या फोनचा गैरवापर करू शकते.
8 / 8
या सर्व कामानंतर मोबाइल फोन चोरीला गेल्याची किंवा हरवल्याची तक्रार पोलिसांना द्या. यासोबत एफआयआरची (FIR) प्रत घ्यायला विसरू नका. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ही प्रत पुरावा म्हणून दाखवू शकता.
टॅग्स :Mobileमोबाइलfraudधोकेबाजी